Goa Women Security| महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ; मात्र दोषसिद्धीचे प्रमाण कमी
Molestation 1
Molestation 1pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद चिंताजनकरीत्या होत असून, अल्पवयीन मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत विविध वयोगटातील महिला अत्याचाराला बळी पडत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने तपास आणि न्यायप्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

२०२३ मध्ये ९७ बलात्कार घटना २०२३ मध्ये राज्यात बलात्काराची ९७ प्रकरणे नोंद झाल्याची माहिती आहे. त्यापैकी उत्तर गोव्यात ५९, दक्षिण गोव्यात ३४, तर इतर विशेष पोलिस ठाण्यांमध्ये ४ प्रकरणे नोंदविण्यात आली. याच वर्षी लैंगिक अत्याचाराची ११९ प्रकरणे नोंदली गेली. उत्तर गोव्यात ७४, दक्षिण गोव्यात ३८ आणि इतर विशेष पोलिस ठाण्यांमध्ये ७ प्रकरणे नोंद झाली

Molestation 1
Goa Casino Businessman Shooting| कॅसिनो व्यावसायिकावरील गोळीबार पूर्ववैमनस्यातून, संशयितांच्या जबाबांमधून क्राईम ब्रँचचा निष्कर्ष

२०२४ मध्ये बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊन १११ प्रकरणे नोंदविण्यात आली. उत्तर गोव्यात ५८, दक्षिण गोव्यात ४५ आणि इतर युनिटमध्ये ८ प्रकरणे नोंदली गेली. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यावर्षी १६३ प्रकरणांची नोंद झाली. त्यापैकी उत्तर गोव्यात १०१, दक्षिण गोव्यात ५२ आणि इतर भागांत १० प्रकरणे नोंदली गेली.

अल्पवयीन मुलींचे प्रमाण चिंताजनक

कळंगुट, हणजूण, कोलवाळ, म्हापसा आणि पेडणे पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद लक्षणीय असल्याचे समोर आले आहे. विशेषतः १३ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींना अशा गुन्ह्यांचा मोठा धोका असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. लहान मुली तसेच वृद्ध महिलाही अत्याचाराच्या घटनांना बळी पडल्याच्या नोंदी आहेत. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची नोंद होत असताना दोषसिद्धीचे प्रमाण कमी राहणे हीदेखील गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे करून पीडितांना वेळेत न्याय मिळण्याची गरज व्यक्त होत आहे.

२०२५ मध्ये काहीशी घट

२०२५ मध्ये बलात्काराच्या नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या १०४ राहिली. उत्तर गोव्यात ५८, दक्षिण गोव्यात ४३ आणि इतर युनिटमध्ये ३ प्रकरणे नोंदविण्यात आली. लैंगिक अत्याचाराची १५६ प्रकरणे नोंदली गेली. यापैकी उत्तर गोव्यात ८६, दक्षिण गोव्यात ६१ आणि इतर भागांत ९ प्रकरणे नोंदली गेल्याची माहिती आहे.

Molestation 1
Goa Assembly Election - कुडचडेत भाजप प्रबळ; काब्राल नव्हे !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news