गोवा आपली बेटे कर्नाटकला देणार नाही; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa Karnataka dispute | राज्य सरकारला केंद्राला पत्र लिहिणार
गोवा आपली बेटे कर्नाटकला देणार नाही; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Published on
Updated on

पणजी : राज्य सरकार आपले कोणतेही बेट कर्नाटकला सोपवणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

गोवा आपली बेटे कर्नाटकला देणार नाही; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Goa Government Health Scheme | लवकरच गंभीर आजारावर 100 रुपयांत आरोग्य तपासण्या

दरम्यान, नयरवार भागातील गोव्याच्या मालकीच्या काही बेटांवर कर्नाटक दावा करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गोवा आपले कोणतेही बेट कर्नाटकला देणार नाही. बंदर विभाग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे आणि गोवा सरकार केंद्र सरकारला पत्रही लिहिणार आहे.

गोवा आपली बेटे कर्नाटकला देणार नाही; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Labor Day | कामगारदिनी ५ कल्याणकारी योजनांची भेट : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले की, कर्नाटकला कोणत्याही बेटाच्या विकासासाठी परवानगी देण्यात आलेली नाही आणि नौदलासोबतचे प्रलंबित प्रश्न सोडवल्यानंतर गोवा स्वतःच्या बेटांचा विकास करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news