

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अन्य वातावरणीय बदलांमुळे सोमवारी राज्यातील वातावरण ढगाळ राहिले. हवामान खात्याने राज्यात पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
असे असले तरी, पुढील पाच दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गोवा कला प्रदर्शन सोमवारी राज्यातील कमाल तापमानात किंचित घट झाली असली, तरी किमान तापमानात वाढ झाल्याने उकाडा कायम होता.
पणजीत ३३ तर मुरगावमध्ये ३५. २ कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस पारा ३३ ते ३५ दरम्यान राहण्याची शक्यता असून, आगामी ३ ते ४ दिवस ही तापमान वाढ कायम राहील.
सोमवारी पणजीत २५ आणि मुरगावमध्ये २३.६ किमान तापमानाची नोंद झाली. २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील किमान तापमान २१ ते २३ दरम्यान राहण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे. २३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान राज्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता आहे.