Goa Dam Water Storage | राज्यावर पाणीटंचाईचे सावट

Goa Dam Water Storage | चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा : धरणांतील साठा चिंताजनक
Goa Dam Water Storage
Goa Dam Water StoragePudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात मान्सून लवकर सक्रिय न झाल्यास पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली असून सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना सुरू केल्या आहेत. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.

Goa Dam Water Storage
Nanded News : 'एल-निनो' मुळे पाणी कपातीचे सक्त निर्देश !

१ ते १६ जून या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ५९.१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा ५ जून रोजी मान्सून गोव्यात दाखल झाला असला तरी त्यानंतर अनुकूल वातावरणाचा अभाव राहिल्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाली आहे. परिणामी, चालू महिन्यात आतापर्यंत केवळ ६.५२ इंच पावसाची नोंद झाली असून हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहे.

राज्यातील सहा प्रमुख धरणांपैकी पाच धरणांतील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत कमी झाला आहे. १५ जून २०२६ अखेरीस साळावली धरणातील पाणीसाठा केवळ २७.६ टक्क्यांवर घसरला असून २०२२ नंतरची ही सर्वात खालची पातळी आहे.

अंजुणे धरणातील पाणीसाठा केवळ ९ टक्क्यांवर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी उपाययोजनांवर भर दिला जात आहे. चिरेखाणीतील साठवलेले पाणी शुद्धीकरण प्रकल्पात आणून नळपाणी पुरवठ्यासाठी वापरण्याचा पर्यायही सरकारकडून विचाराधीन आहे.

तसेच जलस्रोतांचे काटेकोर व्यवस्थापन, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि आवश्यकतेनुसार पुरवठा नियंत्रित ठेवण्यावर भर दिला जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, 'अल निनों' प्रणाली सक्रिय झाल्यामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Goa Dam Water Storage
Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहे.

राज्यातील सहा प्रमुख धरणांपैकी पाच धरणांतील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत कमी झाला आहे. १५ जून २०२६ अखेरीस साळावली धरणातील पाणीसाठा केवळ २७.६ टक्क्यांवर घसरला असून २०२२ नंतरची ही सर्वात खालची पातळी आहे. अंजुणे धरणातील पाणीसाठा केवळ ९ टक्क्यांवर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

चिरेखाणीतील साठवलेले पाणी शुद्धीकरण प्रकल्पात आणून नळपाणी पुरवठ्यासाठी वापरण्याचा पर्यायही सरकारकडून विचाराधीन आहे. तसेच जलस्रोतांचे काटेकोर व्यवस्थापन, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि आवश्यकतेनुसार पुरवठा नियंत्रित ठेवण्यावर भर दिला जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, 'अल निनों' प्रणाली सक्रिय झाल्यामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news