Goa Illegal Call Center | वेर्णात अवैध कॉल सेंटरचा पदार्फाश

Goa Illegal Call Center | पोलिसांनी घेतले तब्बल 26 जणांना ताब्यात; अमेरिकन नागरिकांच्या फसवणुकीनंतर कारवाई
call center racket
call center racket
Published on
Updated on

दाबोळी: वेर्णा पोलिसांनी

मोठी कामगिरी केली असून अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश करत अमेरिकी नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी २६ जणांना अटक करण्यात आली. वेर्णा पोलिसांनी येथील वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका भाड्याच्या जागेतून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश केला असून, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून बनावट ओळख धारण करून अमेरिकन रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी २६ जणांना अटक केली आहे.

call center racket
Konkan Railway Monsoon Timetable | कोकण रेल्वेचा वेग मंदावणार !

दि. २८ मे २०२६ रोजी, विश्वसनीय माहितीच्या आधारे, वेर्णा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर व पोलिस उपनिरीक्षक महेश भोमकर, पोलिस उपनिरीक्षक डेव्हिड कोस्टा, पोलिस उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस, पोलिस उपनिरीक्षक प्रिस्ली कारव्हालो, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निवेद गावकर, हवालदार सुधीर तलेकर, अजित शिरोडकर, पोलिस कॉन्स्टेबल जगदेव धोत्रेकर, पोलीस कॉन्स्टेबल आकाश यादव, पोलीस कॉन्स्टेबल सादिक इंगळगुंडी, पोलिस उपनिरीक्षक सैली नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील मिलाग्रोस अॅक्वा प्रा. लि. येथील प्लॉट क्रमांक ९८ वर पहाटे ०३:०० ते ०६:१५ च्या दरम्यान छापा टाकला. छाप्यादरम्यान, त्या जागेतून एक बेकायदेशीर कॉल सेंटर चालवले जात असल्याचे आढळून आले.

आरोपी व्यक्ती अमेरिकन बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून, अमेरिकन नागरिकांना खोट्या सबबीखाली पैसे भरण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक करत असल्याचे आढळले. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांच्या देखरेखीत, मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी या धाडसी कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवले होते. परिसरातून १४५ लॅपटॉप, ४५ मोबाईल फोन, राउटर, हेडफोन आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे खालील वस्तू जप्त करण्यात आल्या. वेर्ना पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे ५५ लाख रुपये आहे.

call center racket
NHA Report 2026 | राज्याचा आरोग्य खर्च राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट

वेर्णा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ५४/२०२६ अन्वये कलम ३१९, ३१८ (४) सहवाचनीय ३(५) बीएनएस आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-सी, ६६-डी अंतर्गत एकूण २६ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे नागालैंड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांसारख्या विविध राज्यांचे रहिवासी असून ते सांकवाळ येथील ओशन व्ह्यू अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते.

संशयित व्यक्ती अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी व्हीपीएन कॉलिंग आणि स्पूफिंग तंत्रज्ञानाचा वापर करत होते. त्यांनी अमेरिकन बँकांचे अधिकारी असल्याचे भासवून, त्यांना गिफ्ट कार्डद्वारे पैसे हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले. सर्व संशयितांना अटक केली असून त्यांना वास्को-गोवा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे आणि दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जप्त केलेल्या उपकरणांचे सायबर फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे.

फसवणुकीस बळी न पडण्याचे पोलिसांचे आवाहन

गोवा पोलिस/वेर्णा पोलिस नागरिकांना आवाहन करत आहे की, त्यांनी अशा फसव्या कॉल्सना बळी पडू नये. कोणतीही सरकारी संस्था गिफ्ट कार्ड किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे पेमेंट स्वीकारत नाही. संशयास्पद कॉल आल्यास, नागरिकांनी सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा. वेर्णा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news