

पणजी : यावर्षी दहा महिन्यांत राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन गेल्या वर्षीच्या तुलनेत 49 टक्के घटल्याचे दिसून आले आहे. चलन अधिकाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे ही घट झाल्याचे समजते. 2024 मध्ये, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत, पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3,55,063 गुन्हे दाखल केले होते, तर यावर्षी त्याच कालावधीत 1,80,412 गुन्हे दाखल झाले आहेत. राज्य सरकारने एप्रिलमध्ये फक्त पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक यांनाच वाहतूक उल्लंघनांसाठी चलन जारी करण्याचे अधिकार दिले होते. त्यामुळे एप्रिलपासून प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे.
2024 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3,55,063 गुन्हे दाखल झाले होते, तर यावर्षी याच कालावधीत 1,80,412 गुन्हे दाखल झाले आहेत.यापूर्वी, हेड कॉन्स्टेबल आणि असिस्टंट सब-इन्स्पेक्टर यांनाही चलन जारी करण्याचे अधिकार होते.मात्र, ते अधिकार कमी करण्याच्या निर्णयामुळे वाहतूक उल्लंघनाच्या केसेसची संख्या घटली. स्थानिक आणि पर्यटकांना दिलासा देण्यासाठी सरकारने 4 एप्रिल रोजी पोलिसांच्या छळाच्या आरोपांमुळे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल फक्त पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकच चलन दाखल करतील, असा निर्णय घेतला.