पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू असून पावसाळा असो वा उन्हाळा असो बारा महिने गोव्यात पर्यटक येत आहेत. शनिवारी-रविवारी सुट्टीच्या दिवशी राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते.
रविवारी जुने गोवे चर्च परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामध्ये देशी पर्यटकांची संख्या मोठी होती. सकाळी अंतर्गत भागातील पर्यटन क्षेत्राला भेटी देणारे पर्यटक संध्याकाळनंतर समुद्रकिनाऱ्यावर समुद्रस्नानासाठी जातात. त्यामुळे सायंकाळनंतर समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी दिसून येते. देशी पर्यटकांची गर्दी वाढत असून आता विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने गोव्यात येताना दिसत आहेत.