Goa Tourism | पॅराग्लायडिंगसाठी आता हवे पर्यटकाचे हमीपत्र

Goa Tourism | पॅराग्लायडिंग तसेच इतर हवाई क्रीडा (एरो स्पोर्टस्) प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी आता पर्यटकांना हमीपत्र देणे सक्तीचे करण्यात आले आहे.
AI Image
AI Image
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पॅराग्लायडिंग तसेच इतर हवाई क्रीडा (एरो स्पोर्टस्) प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी आता पर्यटकांना हमीपत्र देणे सक्तीचे करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत संबंधित पालकांना हे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

AI Image
Goa Tourism Safety | पर्यटकांची संमती नसेल तर सेल्फी नाही! गोवा पोलिसांचे 'नो कन्सेंट, नो सेल्फी' धोरण कडक

पर्यटन खात्याने या संदर्भात अधिसूचना जारी केली असून, पॅराग्लायडिंग आणि एरो स्पोर्टस्साठीचे नियम निश्चित केले आहेत. नव्या नियमांमध्ये ऑपरेटरांनी घ्यावयाच्या सुरक्षा उपाययोजना, आकारावयाचे शुल्क, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास आकारण्यात येणारा दंड यांचा समावेश आहे.

मागील काळात पॅराग्लायडिंगदरम्यान अपघात होऊन पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पर्यटन खात्याने नोंदणी शुल्कात वाढ करतानाच सुरक्षा नियम आणि अटी अधिक कडक केल्या आहेत. ऑपरेटर तसेच कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले असून, सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

AI Image
Borim Bridge Goa | बोरी पुलावरून वाहतूक सुरू

ऑपरेटरांवर जबाबदारी

नवीन नियमांनुसार, जो पर्यटक किंवा अन्य व्यक्ती पॅराग्लायडिंग अथवा एरो स्पोर्टस्मध्ये सहभागी होऊ इच्छितो, त्याने संबंधित ऑपरेटरला हमीपत्र देणे अनिवार्य आहे. हमीपत्र घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस अशा साहसी क्रीडा प्रकारांत सहभागी करून घेऊ नये, अशी सक्त ताकीद ऑपरेटरांना देण्यात आली आहे. तसेच, ऑपरेटरांनी ही हमीपत्रे सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news