Goa Tourism Safety | पर्यटकांची संमती नसेल तर सेल्फी नाही! गोवा पोलिसांचे 'नो कन्सेंट, नो सेल्फी' धोरण कडक

Goa Tourism Safety | महिलांच्या सुरक्षेसाठी पर्यटन खाते सज्ज; नो कन्सेंट, नो सेल्फी
Goa News
Goa News
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला पर्यटकांची छेडछाड आणि त्यांच्या पर्यटन आनंदात बाधा आणणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी गोवा पोलिसांनी आता नो कन्सेंट, नो सेल्फी (संमती नाही, तर सेल्फी नाही) हे धोरण अत्यंत कडकपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Goa News
Borim Bridge Goa | बोरी पुलावरून वाहतूक सुरू

यापुढे कोणत्याही पर्यटकाचा, त्याच्या परवानगीशिवाय त्याचा फोटो काढल्यास किंवा सेल्फीसाठी आग्रह धरल्यास पोलिसांकडून थेट अटक करण्याची कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून उत्तर गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवर पोलिसांनी कारवाई करत तामिळनाडूतील दोन पुरुष पर्यटकांना ताब्यात घेतले.

हे दोघेही किनाऱ्यावर फिरणाऱ्या इतर पर्यटकांचे त्यांच्या संमतीशिवाय फोटो काढत होते आणि त्यांना त्रास देत होते. पोलिसांनी त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता च्या कलम १७० अंतर्गत प्रतिबंधात्मक कोठडीत घेतले आहे. हे कलम पोलिसांना विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार देते. त्यामुळे पर्यटकांना त्रास देणाऱ्यांवर कायद्याचा वचक राहील

Goa News
Panaji Road Condition | पाटो-मळा जोडपूल झाला, पण रस्ते कधी सुधारणार? भाटले-ताळगाव मार्गावर वाहनधारकांचे हाल

सोशल मीडियावरील गैरवापर

गोव्यातील पर्यटन प्रतिमेला तडा देणाऱ्या काही गंभीर घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. नुकतेच कळंगुट बीचवर एका परदेशी महिला पर्यटकाचे पोहतानाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अलिस्तो लोबो नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याने महिलेच्या संमतीशिवाय व्हिडिओ बनवून पर्यटन क्षेत्राची बदनामी केल्याचा आणि महिलेचा विनयभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ आणि ३५६ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओडिशामधील दोन पर्यटकांनाही रशियन महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news