Goa Tourism Development | पर्यटन उद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा

Goa Tourism Development | आमदार केदार नाईक यांचे प्रतिपादन; ४४ वा वर्धापन दिन उत्साहात
Goa Tourism Development
Goa Tourism Development
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्यटन उद्योग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडसी) सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार केदार नाईक यांनी केले.

Goa Tourism Development
Sanjivani Sugar Factory | संजीवनीचा धूर थांबला अन् ऊस शेतीही सुकली! गोव्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येत 50 टक्के घट

गोवा पर्यटन विकास महामंडळाचा ४४ वा वर्धापनदिन पणजी येथे संपन्न झाला. यावेळी केदार नाईक बोलत होते. याप्रसंगी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आर्लेकर, मार्केटिंग महाव्यवस्थापक गॅविन डायस, लक्ष्मीकांत वायंगणकर, कपिल पैंगिणकर, दीपक नार्वेकर, विशेष नाईक, सचिन गोरे, प्रितेश पालयेकर आदी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

नाईक म्हणाले, जीटीडीसीने गोव्याला जागतिक पर्यटन नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि समुद्रकिनारे यांचे प्रभावी ब्रेडिंग केले आहे. बीच टुरिझमसोबतच पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक पर्यटन या संकल्पनांना प्राधान्य दिले जात असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

Goa Tourism Development
Ashpak Khan Calangute Death |कळंगुटमधील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू की घातपात? 6 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाने खळबळ

समतोल राखत पर्यटन विकास...

राज्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा समतोल राखत पर्यटनाचा विस्तार करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण पर्यटन, निसर्ग पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत, पर्यटन निवास व्यवस्था, जलपर्यटन सेवा, क्रूझ सुविधा आणि पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

तसेच डिजिटल माध्यमातून पर्यटन सेवा अधिक सुलभ करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे नाईक म्हणाले.समतोल राखत पर्यटन विकास... राज्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा समतोल राखत पर्यटनाचा विस्तार करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण पर्यटन, निसर्ग पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत, पर्यटन निवास व्यवस्था, जलपर्यटन सेवा, क्रूझ सुविधा आणि पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. तसेच डिजिटल माध्यमातून पर्यटन सेवा अधिक सुलभ करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे नाईक म्हणाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news