Goa Renting Rules 2026 |भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे आता बंधनकारक; 'गोवा भाडेकरू पडताळणी 2026' कायदा मंजूर

Goa Renting Rules 2026 | भाडेकरू पडताळणी न केल्यास होणार कारवाई
भाडेकरु
शहरातील भाडेकरूंची नोंद करणे बंधनकारक आहेpudhari file photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात घर भाड्याने देणाऱ्या मालकांसाठी सरकारने नवीन नियम लागू केले असून भाडेकरूंची ओळख पडताळणी न केल्यास घरमालकांना सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गोवा पोलिसांनी राज्यभर भाडेकरूंची पडताळणी मोहीम आखून सुमारे एक लाखाहून अधिक बिगर गोमंतकियांची तपासणी केली.

भाडेकरु
Goa Digital Taxi Policy 2026: गोव्याच्या टॅक्सी चालकांना दिलासा! अ‍ॅग्रीग्रेटर अ‍ॅप बंद होणार,'डिजिटल टॅक्सी अ‍ॅप' जागा घेणार

यावेळी भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलिस स्थानकात न दिल्याचे आढळून आल्याने सरकारने नियम लागू करून ही कठोर पावले उचलली आहेत. राज्य सरकारने गोवा (भाडेकरूंची पडताळणी) २०२६ मंजूर करून भाडेकरूंची पडताळणी बंधनकारक केली आहे.

नवीन नियमांनुसार घरमालकांनी भाडेकरूंची ओळखपत्रे तपासणे, त्यांच्या वास्तव्याची नोंद ठेवणे आणि त्यांची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात सादर करणे आवश्यक आहे. घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पाच दिवसांच्या आत संबंधित पोलिस ठाण्यात जमा करावी लागेल. ही माहिती प्रत्यक्ष जाऊन किंवा डिजिटल पद्धतीनेही सादर करता येणार आहे.

या नियमांनुसार पोलिस अधिकारीही तपासणी करू शकतील तसेच भाडेकरूंच्या नोंदींची पडताळणी करू शकतील. नियमांचे पालन न केल्यास घरमालकांवर कारवाई केली जाईल. राज्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि बाहेरून येणाऱ्या भाडेकरूंची नोंद ठेवणे हा या नियमांचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

गोवा हे गुन्हेगारांचे लपण्याचे ठिकाण झाले आहे. काही गुन्हेगार अटक चुकवण्यासाठी गोव्यात भाडेपट्टीवर राहतात. या भाडेकरूंची माहिती सक्तीने घरमालकाने जवळच्या पोलिस स्थानकात द्यायला हवी. ती दिली जात नाही.

भाडेकरु
LPG Stock Goa 2026 | युद्धामुळे इंधन टंचाईची भीती नको! गोव्यात महिनाभर पुरेल इतका गॅस साठा उपलब्ध; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

काहींनी बेकायदेशीर खोल्या बांधून त्या भाडेपट्टीवर दिल्या आहेत. त्याची तपासणी झाल्यास पंचायतीला अधिक घरपट्टी भरावी लागेल त्यामुळे ती चुकवण्यासाठी असे प्रकार घडत आहेत.

घर मालकांना झाली अटक...

हल्लीच अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी काही फ्लॅटमध्ये तसेच भाडेपट्टीवर राहत असलेल्या ड्रग्ज विक्रेत्यांना गजाआड केले. त्यांची माहिती घरमालकाने पोलिसांत दिलेली नाही. त्यामुळे अशा घरमालकांनाही ते ड्रग्ज माफियांना ड्रग्ज साठा खोल्यांत ठेवण्यास मदत करत असल्याचा ठपका ठेवून घरमालकांनाही अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news