Goa Taxi Protest 2026 | माविन गुदिन्हो यांनी टॅक्सीवाल्यांची माफी मागावी

Goa Taxi Protest 2026 | मोगॅम्बो : तोपर्यंत संघटना सरकारी बैठकांना उपस्थित राहणार नाही
Maveen Gudinho
राज्यात अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा चालू राहतील, असे मावीन गुदिन्हो म्हणाले.
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी टॅक्सीवाल्यांची माफी मागावी. जोपर्यंत गुदिन्हो माफी मागत नाहीत, तोपर्यंत कुठल्याच सरकारी बैठकीला आम्ही उपस्थित राहणार नाहीत आणि आमचा गोवा डिजिटल टॅक्सी अॅप (जीडीटीए) ला विरोधच असेल, अशी ठाम भूमिका टॅक्सीवाल्यांच्या वतीने संघटनेचे पदाधिकारी मोगॅम्बो तथा योगेश गोवेकर यांनी मांडली.

Maveen Gudinho
Goa Maze Ghar Scheme | माझे घर योजनेसाठी वर्षभराची मुदतवाढ

मोगॅम्बो यांनी सांगितले की, माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत टॅक्सीवाल्यांची भांडणे झाल्याचे सगळीकडे सांगितले. गुदिन्हो यांनी सांगितले की, गोवा डिजिटल टॅक्सी अॅप घेण्यास सगळे तयार होते. फक्त चार पाचजणच तयार नव्हते. त्याच बैठकीत त्यांचे भांडणही झाले. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नव्हते.

आमची बैठक ५ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक उपस्थित होते. या बैठकीनंतर एक समितीही नेमण्यात आली होती. त्यानंतर ८ मार्च रोजी एक बैठक झाली.

त्या बैठकीत आम्ही सांगितले की, वाहतूक मंत्र्यांनी खोटे बोलल्याबद्दल माफी मागायला हवी. अन्यथा आम्ही बैठकीला बसणार नाहीत. तसे बोलून आम्ही बाहेर पडलो. याबाबत काही पत्रकारांनी आमदार मायकल लोबो यांना भांडणाबाबत विचारले. मात्र, आमदार लोबो खोटे बोलले. याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आवाज उठवल्यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठक घेतली.

यात दोन्ही बाजुंनी चर्चा झाली. बैठक खेळीमेळीत झाली. भांडण वैगरे काही झाले नव्हते असे सांगून डॉ. सावंत यांनी आपण वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांना दिलगिरी व्यक्त करायला सांगतो, बैठकीला बोलावून घेतो, असे सांगितले होते. मात्र, त्याबाबत आजपर्यंत काहीही झालेले नाही, असे मोगॅम्बो यांनी सांगितले. मोगॅम्बो यांनी सांगितले की, आमची संघटना आणि आम्ही सगळे टॅक्सीवाले संघटित आहोत.

Maveen Gudinho
Panaji Municipal Election Result 2026 | पणजीचा 'किंग' कोण? बाबुश मोन्सेरात गड राखणार की उत्पल पर्रीकर परिवर्तन घडवणार?

त्यामुळे आम्ही सरकार आणि वाहतूक मंत्र्यांकडे अशी मागणी करतो की, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी टॅक्सीवाल्यांची माफी मागावी. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत गोवा डिजिटल टॅक्सी अॅपला आमचा विरोध कायम राहील आणि सरकारच्या कोणत्याही बैठकीला आम्ही हजर राहणार नाहीत. याचा मोगॅन्बो यांनी पनरुच्चार केला.

माफिया संबोधून नाव खराब केले

२०१८ मध्ये आलेल्या गोवा माईल्सला २०१९ मध्ये वाहतूकमंत्री होताच माविन गुदिन्हो यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. सपोर्ट केल्याबद्दल आमची तक्रार नाही. पण, गुदिन्हो यांनी आम्हाला टॅक्सी माफिया संबोधण्यास सुरुवात केली आणि आमचे नाव खराब केले. आता पुन्हा एकदा आमच्यात भांडणे झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी माफी ही मागायलाच हवी किंवा त्या दिवशी बैठकीत आमच्यात भांडण झाले नव्हते हे जाहीर करायला हवे, अशी रोखठोक भूमिका मोगॅम्बो यांनी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news