Goa Stray Dog | गोव्यात 25 हजार नसबंदी करूनही भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; दरवर्षी संख्येत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ

Goa Stray Dog | मिशन रेबीज : दरवर्षी किमान 50 हजार शस्त्रक्रिया होणे आवश्यक
Ahilyanagar Dog News
Ahilyanagar Dog NewsPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मिशन रेबीजतर्फे दरवर्षी सुमारे १० हजार कुत्र्यांची नसबंदी केली जाते, तर सरकारकडून आणखी १० ते १५ हजार नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, आवश्यक प्रमाणाच्या तुलनेत ४० ते ५० टक्के तफावत राहिल्याने गोव्यातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दरवर्षी १० ते १५ टक्क्यांनी वाढ होत असल्याची माहिती मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Ahilyanagar Dog News
US attack on Iran: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! होर्मुझ समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या नौका आणि क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त

अनेक वर्षांपासून निर्जंतुकीकरण शिबिरे, लसीकरण कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा राबविल्या जात असल्या, तरी अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यामागे नसबंदी न केलेले पाळीव कुत्रे हे प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. अनेक पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या कुत्र्यांच्या पिलांना रस्त्यावर सोडून देतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरवर्षी जवळपास २५ हजार नसबंदी शस्त्रक्रिया केल्या जात असल्या, तरी ही संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी दरवर्षी किमान ५० हजार नसबंदी शस्त्रक्रिया होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून लसीकरण आणि नसबंदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

नसबंदीसाठी प्रति कुत्रा २०० ते १८०० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामध्ये औषधोपचाराचाही समावेश असतो. स्थानिक संस्थांनी या मोहिमा सातत्याने राबविणे अपेक्षित असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पणजी अनिमल वेलफेअर सोसायटीच्या मानद सचिव श्वेता सरदेसाई यांनी सांगितले की, संपूर्ण गोव्यात नसबंदी शिबिरे आणि जनजागृती मोहिमा नियमितपणे आयोजित केल्या जातात. मात्र, त्याचा दृश्यमान आणि दीर्घकालीन परिणाम होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सातत्यपूर्ण नसबंदी मोहिमा आवश्यक आहेत.

Ahilyanagar Dog News
Pune Theatre Rehearsal Spaces: पुण्यात कलाकारांसमोर तालमींचे संकट; परवडणाऱ्या सराव जागांची मागणी

सध्याचे निर्जंतुकीकरणाचे प्रमाण आवश्यक पातळीपेक्षा कमी असल्याने अनेक भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मनुष्यबळाची कमतरता, अपुरी पायाभूत सुविधा, पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता, भटक्या प्राण्यांना पकडण्यातील अडचणी आणि पाठपुरावा कार्यातील विलंब यामुळे मोहिमेच्या अंमलबजावणीवर मर्यादा येत असल्याचे त्यांनी नमूद केले. अभ्यासानुसार, एखाद्या क्षेत्रात किमान ७५ टक्के नसबंदी आणि त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत सातत्यपूर्ण प्रयत्न झाल्यासच दृश्यमान परिणाम दिसून येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

पणजी परिसरात वारंवार मोहिमा राबवूनही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. योग सेतू आणि मिरामार रोड परिसरात रात्री व पहाटेच्या वेळी एकटे फिरताना भीती वाटते. कारण कुत्रे अचानक दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या मागे धावतात.

- निशी खांडेपारकर, नागरिक

आवश्यकता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये स्पष्ट तफावत आहे. त्यामुळे लसीकरण आणि नसबंदी मोहिमा पूर्णपणे यशस्वी होत नाही. सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारेच हे आव्हान पेलता येईल.

- डॉ. मुरुगन अप्पुपिल्लई, संचालक, मिशन रेबीज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news