Goa ST Reservation Bench Hearing |एसटीसंदर्भात खंडपीठाच्या निवाड्याकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ७ डिसेंबरपासून सुनावणी
supreme court
supreme court
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आगामी विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीला राजकीय आरक्षण मिळणार की नाही याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजकीय आरक्षणाचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणी होऊन त्यावरील निवाड्यावर अवलंबून आहे. त्यामुळे गोव्यातील आदिवासी लोकांचे लक्ष या सुनावणीकडे लागून राहिले आहे.

अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्याविरोधातील याचिका संविधानाच्या अनुच्छेद ३२९ (अ) अंतर्गत ग्राह्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे. संविधानाच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना किंवा जागांचे वाटप करणाऱ्या कायद्यांच्या वैधतेवर न्यायालयीन प्रश्न उपस्थित करण्यास या तरतुदीत मर्यादा असल्याचे केंद्राने उच्च न्यायालयाला दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास विरोध केलेल्या याचिकेवरील सुनावणी येत्या ७ डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुरू होणार आहे. त्यावरील निवाडा ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयाला देणे आवश्यक आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती लागू राहणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने सरकार व मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्वेशन या दोघांना याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाला या याचिकेवरील तातडीने सुनावणी घेणे आवश्यक बनले आहे. अनुसूचित जमातीसमोर हा एकमेव आशेचा किरण उरलेला आहे. उच्च न्यायालयाने निवाडा विरोधात गेला तर पुढील प्रक्रियेला विलंब होऊन हे राजकीय आरक्षण मिळण्याची शक्यता कमी आहे. गोवा विधानसभा मतदारसंघांत अनुसूचित जमातींसाठी प्रतिनिधित्वाच्या पुनर्रचनेसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाची भूमिका मांडली आहे. 'गोवा राज्यातील विधानसभा

मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाची पुनर्रचना अधिनियम, २०२५' याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावावी आणि गोव्याच्या अंदाजित एसटी लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास जनगणना आयुक्तांना रोखणारा अंतरिम आदेश उठवावा, अशी मागणी केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे केली आहे. ही याचिका संविधानाच्या अनुच्छेद ३२९ (अ) अंतर्गत ग्राह्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे. संविधानाच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना किंवा जागांचे वाटप करणाऱ्या कायद्यांच्या वैधतेवर न्यायालयीन प्रश्न उपस्थित करण्यास या तरतुदीत मर्यादा असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.

एसटी लोकसंख्या सुमारे दीड लाख

केंद्राने आपल्या प्रतिज्ञापत्रात गोव्यातील एसटी आरक्षणाची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गोव्यातील एसटी लोकसंख्या केवळ ५६६ इतकी नोंदवली गेली होती. यानंतर २००२ मध्ये कुणबी, गावडा आणि वेळीप या समुदायांचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्यात आला. २०११ च्या जनगणनेनुसार गोव्याची एकूण लोकसंख्या १४,५८,५४५, तर एसटी लोकसंख्या १,४९, २७५ इतकी झाली. त्याचवेळी अनुसूचित जातींची लोकसंख्या २५,४४९ होती. तेव्हा हे राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुरू झाला होता.

supreme court
Goa High Court | गोवा सरकारला उच्च न्यायालयाचा दणका! प्रतिज्ञापत्रासाठी नऊ महिने विलंब, अधिकाऱ्याला दंड

या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आणि संविधानातील अनुच्छेद ३३२ नुसार अनुसूचित जमातींना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी संसदेतून पुनर्रचना कायदा करण्यात आला. या कायद्याला १३ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि तो ६ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आला.

supreme court
One Goa Project Construction Stay| 'वन गोवा' प्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.