Goa Deposit Refund Scheme | राज्यभरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन'चे जाळे

Goa Deposit Refund Scheme | उभारणी पूर्ण; रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, कॅन्स परत करून मिळणार 'ठेव रक्कम'
Goa Deposit Refund Scheme | राज्यभरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन'चे जाळे
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गोवा डिपॉझिट रिफंड स्कीमच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील आवश्यक पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रशासनाची तयारी नियोजनानुसार पूर्ण होत असून, अशा मोठ्या प्रमाणावर कंटेनर डिपॉझिट प्रणाली कार्यान्वित करणाऱ्या भारतातील पहिल्या राज्यांपैकी एक म्हणून गोवा पुढे येत आहे.

Goa Deposit Refund Scheme | राज्यभरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन'चे जाळे
Sindhudurg News : सावंतवाडी उपजिल्हातील 'इंडोस्कोपी' मशीन वारंवार नादुरुस्त

डिपॉझिट रिफंड योजनाच्या टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या अंमलबजावणीचा भाग म्हणून, गोव्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी रिव्हर्स व्हेंडिंग मशीनची स्थापना करण्यात येत आहे. नुकतीच कांदोळी बांध, साखळी किल्ला, हणजूण ग्रामपंचायत, मोरजी ग्रामपंचायत, चिखले येथील विशाल मेगा मार्ट, आगोंदा ग्रामपंचायत, कोला ग्रामपंचायत, वेलिंग-प्रियोळ येथील श्री मंगेश मंदिराजवळ, बोगमाळो बीच तसेच साल्वादोर-दो-मुंडो ग्रामपंचायत येथे मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत.

या नव्या स्थापनेनंतर राज्यभरातील रिव्हर्स व्हेंडिंग मशीनची एकूण संख्या १०० वर पोहोचली असून, त्यापैकी ६९ मशीन उत्तर गोव्यात तर ३१ मशीन दक्षिण गोव्यात कार्यरत आहेत. या वाढत्या संकलन जाळ्यामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा अधिक बळकट झाली असून, नागरिकांना रिकाम्या प्लास्टिक बाटल्या आणि कॅन्स सहजपणे परत करण्यासाठी राज्यव्यापी सुविधा उपलब्ध होत आहेत.

Goa Deposit Refund Scheme | राज्यभरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन'चे जाळे
Sindhudurg News : सावंतवाडी उपजिल्हातील 'इंडोस्कोपी' मशीन वारंवार नादुरुस्त

ही रिव्हर्स व्हेंडिंग मशिन्स संपूर्ण संकलन व्यवस्थेचा कणा असून, नागरिकांना रिकाम्या बाटल्या आणि कॅन्स परत करून त्यावरील ठेव रक्कम (डिपॉझिट) परत मिळविण्याची सुविधा देतात. सार्वजनिक ठिकाणे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरांमध्ये ही यंत्रे टप्प्याटप्प्याने बसविण्यात येत असून, जनजागृतीही करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news