गोव्याच्या रम्य किनारपट्टीवर, जिथे निसर्गाचे सौंदर्य आणि पर्यावरणाचे महत्त्व जपण्याची गरज आहे. कचरा व्यवस्थापन संकटाला प्रतिसाद म्हणून एका महत्त्वपूर्ण उपक्रमाने गोव्यात आपली जागा निर्माण केली आहे. या प्रकल्पाचे नाव आहे एकात्मिक कचरा व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजेच हिंदुस्थान वेस्ट ट्रीटमेंट प्लांट होय. माजी मुख्यमंत्री तसेच भारताचे संरक्षण मंत्री यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभा राहिला होता. गोव्याच्या विकासात हा प्रकल्प एक मोठा पायंडा निर्माण करत आहे.
राज्यातील वाढत्या कचरा समस्येवर रा तोडगा काढण्यासाठी साळगाव पठारावर बांधण्यात आलेल्या स्टेट ऑफ आर्ट अत्याधुनिक अशा कचरा प्रकल्पाला गोवा घटक राज्य दिनी १० वर्षे पूर्ण झाली. हा प्रकल्प गोव्यासाठी वरदान ठरत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने हा प्रकल्प साळगावसाठी सकारात्मक ठरत आहे.
या प्रकल्पात दिवसाला सरासारी २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून राज्यात विविध प्रकल्प साकारले जात आहेत. राज्याच्या हरित ऊर्जा आणि खात निर्मितीमध्ये हा प्रकल्प एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या प्रकल्पाचे बहुआयामी उद्देश हे पर्यावरण संवर्धन आणि जनतेसाठी महत्वाचे आहेतच; पण या क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करून समाजात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या असंघटित कचरा कामगारांना आयुष्याला एक वेगळा उद्देश देणारा आहे.
तब्बल ६.३० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया:
कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण, अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत असलेल्या वा कचरा प्रकल्पात मागील नऊ वर्षांत ६.३० लाख मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. सहाः स्थितीत या प्रकल्पात दिवसा तीन पाळ्यांतून सरासरी २५० टन कचऱ्यावर यशस्वीपणे प्रक्रिया केली जाते.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत या प्रकल्पाच्या कामाला नोव्हेंबर २०१४ मध्ये शुभारंभ करण्यात आला होता. अवघ्या दीड वर्षात जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. साडेतीन वर्षांपूर्वी डिसेंबरात प्रकल्पाचा विस्तार करून क्षमता वाढवण्यात आली होती. या विस्तारावर अंदाजित १०३ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मागील दहा वर्षांत प्रकल्पात यशस्वीरीत्या सुमारे ६.३० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली, तर मागील वर्षभरात सुमारे ९१,९३७ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली.
सध्या दोन पाळ्यांमध्ये दिवसा सरासरीवर २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तर तिसन्या पाळीत प्रकल्पाची साफसफाई तसेच देखभाल करण्यावर भर दिला जातो. प्रकल्पात येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण केले जाते. वर्गीकरण केलेल्या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी तसेच विल्हेवाट लावण्यासाठी सिमेंट फॅक्टरीत पाठविले जाते.
असा आहे कचरा प्रकल्प...
या प्रकल्पासाठी सरकारने १.४६ लाख चौरस मीटर जमीन ताब्यात घेतली होती. यातील ८०८० चौरस मीटर जागा साळगाव कोमुनिदादकडून, तर १.३८ लाख चौरस मीटर जागा कळंगुट कोमुनिदादकडून घेतली होती. प्रकल्पाच्या उभारणीवर १४६ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. या प्रकल्पाचे बांधकाम हिंदुस्थान वेस्ट ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर दहा वर्षांच्या कालखंडावर देण्यात आले होते.
यांचे बहुमूल्य मार्गदर्शन
डॉ. शरद काळे यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत कचरा व्यवस्थापनात बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. तसेच श्री संदीप प्रभू, जोगळेकर सर, श्री लेव्हिन्सन मार्टीन्स यांच्या संयुक्त परिश्रमाने १० वर्षांचा बहुमूल्य टप्पा ओलांडला आहे. गोव्याच्या पुढील १० वर्षांच्या कालावधीचा विचार करताना गोव्यातील कचऱ्याचे व्यवस्थापन हे संपूर्ण गोव्यासाठी फलदायी ठरणार आहे.
गोवा हा कचरा व्यवस्थापनामध्ये आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आहे. गोव्यात ज्याप्रमाणे घनकचरा, बायोमेडिकल कचरा व ई-वेस्ट कचरा हाताळला जातो ते पाहण्याजोगे आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री