Goa News | गोव्यातील सर्व जलमार्गांवर रो-रो फेरी बोटी सुरु करणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

चोडण-रायबंदर मार्गावर रो-रो फेरींचा शुभारंभ
Goa News
रो रो सेवेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व अन्य मान्यवर Pudhari Photo
Published on
Updated on

पणजी : राज्यातील सर्व आठही जलमार्गांवर जुन्या फेरी बोटींच्या जागी नव्या पर्यावरणपुरक रो-रो फेरी बोटी सुरू करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यातील जलवाहतुकीला गती देणारा आणि पर्यावरणपूरक प्रकल्पाचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Goa News
Goa Environment | चोर्ला घाटात आढळले दुर्मिळ ‘स्कर्ट मशरूम’

चोडण–रायबंदर या प्रमुख जलमार्गावर 'गंगोत्री' आणि 'द्वारका' या दोन नव्या फेरी बोटी आज सुरू करण्यात आल्या. यावेळी अंतर्देशीय जलमार्ग (वॉटरवेज) मंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या दोन्ही बोटी सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल ( पीपीपी )अंतर्गत कार्यरत असणार असून, राज्यातील जुन्या पारंपरिक फेरीबोटी हटवून सर्व मार्गांवर अशाच आधुनिक रो-रो फेरी तैनात करण्याचा सरकारचा मानस आहे, गोवा ही हरित राज्य म्हणून ओळख निर्माण करत आहे. जुन्या डिझेलवर चालणाऱ्या बोटींच्या तुलनेत या नव्या फेरींमुळे शून्य कार्बन उत्सर्जन होणार असून, त्या पर्यावरणासहित प्रवाशांसाठीही सुरक्षित आणि वेगवान असतील. यामुळे गोव्याची जलवाहतूक प्रणाली अधिक शाश्वत आणि आधुनिक होणार आहे, असेही ते म्हणाले.

Goa News
Goa Governor | पुसापती अशोक गजपती राजू गोव्याचे नवे राज्यपाल
रो-रो फेरी बोट
रो-रो फेरी बोट Pudhari Photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news