Goa Breast and Colorectal Cancer | गोव्यात स्तन, मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या रुग्णांत वाढ

खासगी रुग्णालयाकडून २०१९-२०२४ या कालावधीतील ५७० प्रकरणांच्या अभ्यासातून निष्कर्ष समोर
Goa Breast and Colorectal Cancer
Goa Breast and Colorectal Cancer
Published on
Updated on

पणजी : गोव्यात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, स्तनाचा कर्करोग आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग हे सर्वाधिक आढळणारे दोन कर्करोग आहेत. पणजी येथील हेल्थवे हॉस्पिटलने २०१९ ते २०२४ या कालावधीतील कर्करोगाच्या ५७० प्रकरणांचा अभ्यास केला असता, एकूण प्रकरणांपैकी २६.८५ टक्के प्रकरणे स्तनाच्या कर्करोगाची होती.

त्याखालोखाल १९.०९ टक्के प्रकरणे मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची होती, असे आढळून आले आहेत. हे निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झाले आहेत. कर्करोगाचे प्रमाण ६० ते ७० वयोगटातील लोकांमध्ये सर्वाधिक (२७.४ टक्के) होते. त्याखालोखाल ७० ते ८० वयोगटातील लोकांमध्ये (२६ टक्के) होते. २०१९-२०२४ या पाच वर्षांच्या अभ्यासातील रुग्णांच्या माहितीचे जे विश्लेषण केले त्यातून हे निष्कर्ष अंदाजे ५७० रुग्णांवरून घेण्यात आले आहेत.

गोव्यात कर्करोगाचे जे प्रकार आठळत आहेत त्यात स्तनाचा कर्करोग, मोठी आतडी (कोलन) कर्करोग, तोंडाचा आणि घशाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व निदान न झालेली प्रकरणे दिसून येतात. गोव्यातील मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे उच्च प्रमाण हे भारतीय आकडेवारीपेक्षा एक लक्षणीय तफावत दर्शवते, फुफ्फुसाचा आणि तोंडाचा कर्करोगही अधिक प्रमाणात आढळतो, असे एका खाजगी रुग्णालयातील सल्लागार सामान्य चिकित्सक (अंतर्गत औषधशास्त्र) आणि या अभ्यासाच्या प्रमुख डॉ. चित्रलेखा नायक म्हणाल्या.

एका खासगी रुग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. श्रीधरन एम म्हणाले की, गोव्यातील वृद्ध लोकसंख्येकडे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणामुळे नैसर्गिकरित्या कर्करोगाचे प्रमाण वाढते. जीवनशैली आणि आहाराच्या सवयी त्याल कारण ठरत आहेत. अल्कोहोल मर्यादित करा किंवा टाळा, निरोगी, संतुलित आहार निवडा, शारीरिक सक्रिय राहा, असेही ते म्हणाले.

Goa Breast and Colorectal Cancer
Goa|विद्यार्थी संघटना राजकीय दावणीला

गोवा मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. आर. जी. वाईजमन पिंटो म्हणाले, कर्करोग आता जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण बनला आहे. त्यामुळे लवकर निदान करणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते, असे डॉ. पिंटो म्हणाले.

उपचारांमध्ये सामान्यतः शस्त्रक्रिया केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि इम्युनोथेरपी यांचा समावेश असतो. लवकर निदान झालेले कर्करोग मोठ्या प्रमाणात बरे होऊ शकतात, असे डॉ. पिंटो यांनी सांगितले. त्यांनी लोकांना, अचानक वजन कमी होणे, सतत सुस्ती येणे, वेदनाहीन गाठी किंवा असामान्य रक्तस्त्राव यांसारख्या धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आणि अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला.

Goa Breast and Colorectal Cancer
ST Community Political Reservation |एसटी समाजाला राजकीय आरक्षणासाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कर्करोगाची अनेक प्रकरणे अनुवांशिक असतात. विशेषतः ज्यांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास आहे अशा व्यक्तींसाठी या व्यक्तींनी कमी वयातच तपासणी सुरू करावी आणि जनुकीय चाचणीचा विचार करावा, असे ते म्हणाले. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी एचपीव्ही लस आणि यकृताच्या कर्करोगासाठी हिपॅटायटीस बी लस यांसारख्या प्रतिबंधात्मक लींचा वापर केल्याने आवश्यक संरक्षण मिळते. धोक्याची चिन्हे आणि प्रतिबंधात्मक चाचण्या, ज्यामध्ये वैद्यकीय तपासणी, रक्त चाचण्या, इमेजिंग आणि ट्यूमर मार्कर्स यांचा समावेश आहे, याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवली पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

निरोगी आरोग्यासाठी या उपाययोजना करा

अभ्यासात आढळून आले आहे की, लाल मांस आणि मद्यपानामुळे मोठ्या आतड्याच्या आणि गुदद्वाराच्या कर्करोगाचा धोका वाढतो. निरोगी आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, तंबाखू टाळणे आणि मद्यपानावर मर्यादा घालणे हे उपाय कर्करोगाचा धोका कमी करण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण हे लठ्ठपणा, अस्वास्थ्यकर आहार सवयी आणि अपुरा शारीरिक व्यायाम यांसारख्या जीवनशैली घटकांशी संबंधित असल्याचे दिसून येते, असे डॉ. चित्रलेखा नायक म्हणाल्या.

५७० प्रकरणे अभ्यासात आढळलेले कॅन्सरचे प्रकार, रुग्णसंख्या

मोठी आतडी (कोलन) कर्करोग - १०९

स्तनाचा कर्करोग - १५३

तोंडाचा आणि घशाचा कर्करोग - ३६

गर्भाशयाचा कर्करोग -२१

निदान न झालेली प्रकरणे - २५१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news