Revolutionary Goans Party | आरजीचा 'रिमोट' कोणाच्या हाती ?

Revolutionary Goans Party | 'टास्क कम्प्लिटेड' पोस्टमुळे पक्षातील दुफळी पुन्हा चर्चेत
Manoj Parab
पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष मनोज परब. सोबत अजय खोलकर, विश्वेश नाईक आणि इतर पदाधिकारी.
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा (आरजी) रिमोट नेमका कोणाच्या हाती आहे, हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. पक्षातील आमदार विरेश बोरकर यांचे समर्थक असलेल्या १० सदस्यांच्या हकालपट्टीनंतर खजिनदार अजय खोलकर यांनी 'टास्क कम्प्लिटेड' अशी केलेली टिप्पणी आणि माजी अध्यक्ष मनोज परब यांच्या पोस्टशी त्याचा संबंध जोडला जात असल्याने पक्षातील पडद्यामागील नेतृत्वाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

Manoj Parab
Goa Tourism sector - गोवा पर्यटन क्षेत्र धोक्यात

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले असून, पक्षातील गटबाजीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पक्षाने मंगळवारी १० सदस्यांची पक्षविरोधी कारवायांप्रकरणी हकालपट्टी केल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे.

हकालपट्टी करण्यात आलेले सदस्य हे वीरेश बोरकर यांचे समर्थक असल्याची चर्चा आहे. यापूर्वी माजी अध्यक्ष मनोज परब यांनी 'मान्सूनपूर्व सफाई आवश्यक आहे' अशी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टचा संबंध पक्षातील अंतर्गत बदलांशी जोडला जात होता.

दरम्यान, हकालपट्टीनंतर अजय खोलकर यांनी तीच पोस्ट पुन्हा शेअर करत 'टास्क कम्प्लिटेड' अशी टिप्पणी केली. त्यामुळे पक्षातील निर्णयप्रक्रिया आणि पडद्यामागील नेतृत्वाबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींमुळे गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, आरजीमध्ये नेमके काय सुरू आहे, याबाबत कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. पक्ष नेतृत्वाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Manoj Parab
Opposition to Casinos in Goa - गोव्यात कॅसिनोला वाढता विरोध

माजी अध्यक्षांचा प्रभाव कायम ?

मनोज परब यांनी अध्यक्षपद सोडले असले तरी पक्षावर त्यांचा प्रभाव कायम असल्याचा आरोप काही कार्यकर्ते व विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे पक्षातील निर्णयप्रक्रिया नेमकी कोणाच्या नियंत्रणाखाली चालते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news