Goa Cyber Crime Record: दररोज 15 गोवेकर जाळ्यात, 6 महिन्यांत 41 कोटींचा गंडा; ई-झिरो एफआयआर नोंदणीत गोवा देशात चौथ्या स्थानावर

Goa Cyber Crime Record: सायबर गुन्ह्यांमध्ये ई-झिरो प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवणाऱ्या देशातील पाच आघाडीच्या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये गोव्याने चौथे स्थान मिळविले आहे.
Cyber Crime
Cyber Crime ( File Photo)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सायबर गुन्ह्यांमध्ये ई-झिरो प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवणाऱ्या देशातील पाच आघाडीच्या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये गोव्याने चौथे स्थान मिळविले आहे. गोवा पोलिसांनी आतापर्यंत ४४६ ई-झिरो एफआयआर नोंदविले आहेत. या यादीत दिल्ली (६,११५), चंदीगड (४,१७४), उत्तराखंड (५५२), गोवा (४४६) आणि राजस्थान (२५१) यांचा समावेश आहे. मे २०२५ पासून ही ई-झिरो एफआयआर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

Cyber Crime
Vijay Sardesai | विजय-गिरीश यांचे 'मिले सूर मेरा तुम्हारा! गोव्यात युती बळकट करण्याचा काँग्रेस अन् गोवा फॉरवर्डचा निर्धार"

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ नुसार, दखलपात्र गुन्ह्याची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देण्याची तरतूद आहे. केंद्र सरकारने सायबर गुन्ह्यांसाठी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल तसेच १९३० हेल्पलाईनद्वारे ई-झिरो एफआयआर नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित राज्याच्या ई-क्राईम पोलिस ठाण्यात ई-झिरो एफआयआर आपोआप नोंद होऊन तो संबंधित प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला जातो. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, झिरो एफआयआरचे नियमित एफआयआर मध्ये रूपांतर करण्यासाठी तक्रारदाराने तीन दिवसांच्या आत संबंधित पोलिस ठाण्यात उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Cyber Crime
Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!

यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत गोव्यात दररोज सरासरी १५ नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरले. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवरील आकडेवारीनुसार, २,६३७ गोवेकरांनी सुमारे ४१ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन केला आहे. मात्र, फसवणूक करणाऱ्यांची बँक खाती गोठवून गोवा पोलिसांनी सुमारे ९५ कोटी रुपये वाचवण्यात यश मिळविले आहे.

सायबर फसवणूक करणारे स्वतःला सरकारी अधिकारी, स्टॉकब्रोकर, एअरलाइन कर्मचारी, ऑनलाइन बुकिंग एजंट किंवा व्यापारी असल्याचे भासवून नागरिकांचा विश्वास संपादन करतात. अनेक फसवणुकीची सुरुवात सोशल मीडियावरील बनावट जाहिरातींपासून होते. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्यूआर कोड पाठवून पैसे उकळले जातात.

Cyber Crime
Vijay Sardesai | विजय-गिरीश यांचे 'मिले सूर मेरा तुम्हारा! गोव्यात युती बळकट करण्याचा काँग्रेस अन् गोवा फॉरवर्डचा निर्धार"

पैसे मिळाल्यानंतर वस्तू किंवा सेवा न देता संपर्क तोडला जातो. काही प्रकरणांत पैसे न दिल्यास वैयक्तिक अथवा कुटुंबीयांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकीही दिली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गमावले ४१ कोटी, वाचवले ९५ कोटी

राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत दररोज सरासरी १५ नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरले. या कालावधीत २,६३७ गोवेकरांनी एकूण सुमारे ४१ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन केला. मात्र, तातडीने कारवाई करून फसवणूक करणाऱ्यांची बँक खाती गोठविल्यामुळे पोलिसांना सुमारे ९५ कोटी रुपये वाचविण्यात यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news