Goa Politics 2025 | नाही 'मनोहर', तरी वर्चस्व भाजपचेच !

Goa Politics 2025 | मंत्री रवी नाईक यांचे निधन मनाला चटका लावणारे
Nanded News
Nanded Newspudhari photo
Published on
Updated on

पणजी : विठ्ठल गावडे

पारवाडकर गोव्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) जि. पं. निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. भाजपला मिळालेले नवे अध्यक्ष, मंत्रिमंडळात झालेला फेरबदल, माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन आणि सर्वच स्तरावर विरोधकांची सुमार कामगिरी हे यंदाच्या वर्षभरातील ठळक राजकीय मुद्दे म्हणता येतील.

Nanded News
Shilpa Shetty Goa Resort | शिल्पा शेट्टीच्या गोव्यातील रिसॉर्टचे भवितव्य आज ठरणार

वाढती गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, हणजूण, शिरगावसारख्या दुर्घटना असा सगळा 'मनोहर' कारभार नसतानाही भाजपचेच यावर्षी वर्चस्व राहिले, हे विशेष ! २०२५ वर्षाच्या राजकीय पटलावरील घडामोडींचा विचार करता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग सहा वर्षे मुख्यमंत्री राहून केलेली अपूर्व कामगिरी, भाजपने राजकीय पटलावर व वर्षाच्या शेवटी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मिळवलेले वर्चस्व, भाजपला दामू नाईक यांच्या रूपाने मिळालेले नवे अध्यक्ष, कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन या प्रमुख घटना आहेत. यातील नाईक यांचे अकाली निधन चटका लावणारे ठरले.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या जागी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांची निवड झाली. त्यांनी भाजपची संघटना मजबूत करतानाच वर्षभर भाजपचे काम सक्रियपणे सुरू ठेवले. मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची चर्चा जानेवारीत सुरू झाली आणि प्रियोळचे आमदार व तत्कालीन कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.

कायदामंत्री असलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनाही वगळण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळात नवे मंत्री म्हणून अनुक्रमे रमेश तवडकर व दिगंबर कामत यांचा शपथविधी झाला. तवडकर यांनी सभापतीपद सोडल्यानंतर सावर्डेचे आमदार गणेश गावकर हे विधानसभेचे सभापती झाले.

याचवर्षी २०२२ ची विधानसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस सोबत लढवलेल्या मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत येत, आम्ही पुढील काळामध्ये एनडीएमध्ये राहणार असल्याचे जाहीर केले. राज्यामध्ये तिसऱ्या जिल्ह्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सुतोवाचही केले मात्र वर्ष संपले तरी प्रक्रिया काही पुढे गेली नाही. जि. पं. निवडणुकीत भाजपची वाढली मते जिल्हा पंचायतीच्या निवडणुका वर्षाच्या अखेरीस झाल्या.

Nanded News
Goa Night Club Fire Case | हडफडे नाईट क्लब आगीवर चौकशी अहवाल सादर; प्रशासनिक त्रुटींवर ठपका

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकांमध्ये भाजपने पुन्हा दोन्ही जिल्हा पंचायतींवर बहुमत मिळवले. मगो पक्षासोबत त्यांनी निवडणुका लढवल्या. यात भाजपला २९, काँग्रेसला ११, मगोला ३, आरजी पक्षाला २, आप व गोवा फॉरवर्ड प्रत्येकी १ व अपक्षांना ४ जागा मिळाल्या.

या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी वाढली. मागील जिल्हा पंचायतील ३८.३५ टक्के मते मिळवलेल्या भाजपला या निवडणुकीत ४०.६३ टक्के मते मिळाली. काँग्रेसला १८.९३ टक्के मिळाली. दामू नाईक हे पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले. राज्यात नव्या पेयजल खात्याची निर्मिती याच वर्षी राज्य सरकारने नव्या पेयजल खात्याची निर्मीती केली. त्याचा ताबा समाजकल्याण खात्याचे मंत्री असलेले सुभाष फळदेसाई यांच्याकडे देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news