Bangladeshi Infiltrators Alert | गोव्यात बांगलादेशी घुसखोरांवर पोलिसांची करडी नजर! भाडेकरूंची माहिती लपवल्यास घरमालकांवर होणार कठोर कारवाई

Bangladeshi Infiltrators Alert | भाडेकरू आढळल्यास घर मालकांवर कठोर कारवाईचा इशारा
Bangladeshi Citizens
Bangladeshi Citizens | बांगलादेशी नागरिकांना केली अटकpudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

देशात एसआयआर सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याने विविध राज्यांतील बांगला देशी नागरिक आश्रयासाठी इतर राज्यात धावू लागले आहेत. सुमारे २५० जणांच्या गटाला हुबळी पोलिसांनी गोव्यात प्रवेश करण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. त्यामुळे गोव्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व पोलिस स्थानकांना बांगला देशी घुसखोरांवर नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Bangladeshi Citizens
Pune Theatre Rehearsal Spaces: पुण्यात कलाकारांसमोर तालमींचे संकट; परवडणाऱ्या सराव जागांची मागणी

तसेच भाडेकरू ठेवण्यापूर्वी त्याची सर्व माहिती पोलिसांना वेळेत न दिल्यास कठोर कारवाई घर मालकांवर केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. बांगला देशी घुसखोर पश्चिम बंगालमध्ये कित्येक वर्षे होते. मात्र हल्लीच निवडणुका होऊन तेथे भाजप सरकार आल्याने तेथील या घुसखोरांचे धाबे दणाणले आहे.

पश्चिम बंगालमधून काढता पाय घेत ते देशातील इतर राज्यासह गोव्यामध्ये वास्तव्यास सरसावले आहेत. गोवा सरकारने गेल्या वर्षी गोव्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करून असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात धडक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत सापडलेल्या बांगला देशींना हद्दपार करण्यात आले होते. त्यामुळे पुन्ह बांगला देशी घुसखोर गोव्यात येऊ नयेत म्हणून बसस्थानके व रेल्वे स्थानकांवन पोलिस तैनात केले असून संशयास्पत आढळून येणाऱ्या प्रवाशांची चौकश करण्याच्या सूचना करण्यात आल्य आहेत.

Bangladeshi Citizens
US attack on Iran: अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! होर्मुझ समुद्रात सुरुंग पेरणाऱ्या नौका आणि क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त

बेळगाव पोलिसांनी केलेल्य कारवाईत या संशयास्पद बांगला देश घुसखोरांकडे असलेल्या ओळखपत्रांच तपासणी सुरू झाली आहे. अनेकांकडे आधार कार्ड तसेच मतदार ओळखपत्रेह आहेत. त्यामुळे या दस्तावेजार्च तपासणी बेळगाव पोलिस करत आहेत.

'त्या' बांगला देशींना केले होते हद्दपार

गोवा पोलिसांनी राज्यात केलेल्या बांगला देशी नागरिकांच्या शोध मोहिमेवेळी प्रत्येक पोलिस स्थानकाच्या अखत्यारित झोपडपट्टी वस्ती पिंजून काढण्यात आल्या. त्यावेळी बांगला देशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करून राहत असल्याचे उघड झाले होते. या नागरिकांना देश सोडून आपल्या मायदेशी देण्याची किंवा कायद्यानुसार कारवाईला सामोरे जाणे असे दोन पर्याय देण्यात होते. पोलिसांना त्यांना म्हापसा येथील बंदिस्त केंद्रात ठेवले होते. त्यांच्याकडे मायदेशात जाण्यासाठी पैसे नसल्याचा कांगावा करून गोव्यातच राहण्याचा बेत गोवा सरकारने उधळून लावला. या बांगला देशींची जाण्याची तिकिटे काढून हद्दपार करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news