Gold Theft News| दोनापावला, म्हापसा दरोडा प्रकरणी आणखी तीन बांगलादेशींचा शोध सुरू

या दोन घटनांमध्ये एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा आरोप आहे.
Gang selling fake gold in Belgaum
सावधान, बनावट सोनेविक्री करणारी टोळी बेळगावात. Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दोनापावला आणि म्हापसा येथे झालेल्या दोन दरोड्यांप्रकरणी गोवा पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, या गुन्ह्यांमध्ये कथित सहभाग असलेल्या आणखी तीन बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. या दोन घटनांमध्ये एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा आरोप आहे.

Gang selling fake gold in Belgaum
Goa Politics | 'आरजी'मधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील दरोडेखोरांनी चौकशीदरम्यान चोरलेले सोन्याचे दागिने आणि रोकड आपापसात वाटून घेतल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर हा मुद्देमाल बांगलादेश, बंगळुरू आणि भारतातील इतर भागांतील 'रिसिव्हर' मार्फत विकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच बांगलादेशी दरोडेखोरांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर त्यांना म्हापसा दरोडाप्रकरणी पोलिस कोठडी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरीच्या मालमत्तेचा काही भाग बंगळुरूमधील दोन व्यक्तींमार्फत विकल्याचे सांगितले.

मात्र, तपास अधिकाऱ्यांना आरोर्णीकडून मिळालेली माहिती विसंगत आणि अस्पष्ट वाटल्याने सखोल चौकशी तीव्र करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व दरोडेखोरांनी वैध प्रवास कागदपत्रांशिवाय आणि इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन करून अनधिकृत मार्गाने भारतात प्रवेश केला होता.

पूर्वनियोजित पद्धतीने दरोडे टाकण्याच्या उद्देशाने ते मेघालयातून भारतात आल्यावर बंगळुरूमार्गे गोव्यात दाखल झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी सूत्राने सांगितले की, ही टोळी संघटित गुन्हेगारी गटाप्रमाणे कार्यरत होती.

Gang selling fake gold in Belgaum
Goa | पूर्वेतील रोम नव्हे, दक्षिण काशी गोवा

टोळीतील प्रत्येक सदस्याला विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. यात घरांवर पाळत ठेवणे, दरोडा घालणे, परिसराची टेहळणी करणे आणि चोरीचा मुद्देमाल विकणे यांचा समावेश होता.

दोनापावला या परिसरात साधारण आठवडाभर दरोडेखोर बंगल्यावर दरोडा घालण्यासाठी आपले सावज निश्चित करत होते. ही टेहळणी करून बंगल्याची माहिती दरोडेखोरांना पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक केली होती. म्हापसा येथील बंगल्याबाबतीतही तशीच पद्धत वापरण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news