Goa Politics | 'आरजी'मधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Goa Politics | राजकीय वर्तुळात खळबळ : मनोज परब म्हणाले, योग्यवेळी खुलासा करणार
Goa Politics
Goa Politics
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांनी आता उघड स्वरूप धारण केले आहे. पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी मंगळवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून दूर असलेले परब अचानक सोशल मीडियावर आक्रमकपणे सक्रिय झाले.

Goa Politics
Bori Garbage Management issue - बोरीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अखेर मार्गी

विविध पक्ष कार्यकर्त्यांची स्पष्ट नावे, सूचक संदेश आणि अप्रत्यक्ष टोलेबाजी करत त्यांनी आपला संताप व्यक्त केल्याचे दिसून आले. योग्य वेळ आल्यावर लवकरच माध्यमांसमोर येईन, असेही त्यांनी सुचवल्याने आता पक्षाच्या सर्व हालचालींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

मनोज परब आणि पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने या चर्चाना अधिक बळ मिळाले. या पार्श्वभूमीवर, आमदार वीरेश बोरकर पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. याबाबत दैनिक 'पुढारी'ने विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त छापले होते.

Goa Politics
Goa | पूर्वेतील रोम नव्हे, दक्षिण काशी गोवा

मात्र, काही दिवसांपूर्वी माध्यमांनी विचारणा केली असता, बोरकर यांनी सर्व दावे फेटाळून लावत 'पक्ष एकसंघ आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका,' असे स्पष्ट केले होते. मात्र, मनोज परब यांच्या आक्रमक सोशल मीडिया हालचालींनंतर पक्षात दोन गट स्पष्टपणे सक्रिय झाल्याचे चित्र समोर येत आहे. एका बाजूला परब समर्थक कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे आमदार बोरकर यांना स्थानिक पातळीवर मोठे लोकसमर्थन असल्याची चर्चा सुरू आहे.

पक्षाची मान्सूनपूर्व 'सफाई'!

मनोज परब यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये 'पक्षाची मान्सूनपूर्व साफसफाई करत असल्याचा उल्लेख आहे. यावरून येत्या काही दिवसांतच ते मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. तसेच अध्यक्षपद पाहिजे तर सांगायचे होते, माझी आई आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अश्रूचा हिशेब होईल, अशा शब्दांत परब सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. याशिवाय त्यांनी लिसिओ रोनकॉन, मयुरेश साळगावकर, आदित्य देसाई, प्रशांत पागी आणि उघडपणे मनोज यांच्यावर टीका आणि वरिश यांना पाठिंबा देणाऱ्या तृप्ती बकाल अशा अनेकांची जाहीर नावे घेत सडेतोड टीका केली. यावरून बोरकर यांच्या निकटवर्तीयांवर त्यांचा विशेष राग असल्याचेही वारंवार दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news