

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा पोलिस खात्याच्या विविध पोलिस स्थानकांत पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सध्या मंजूर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे १ हजार पोलिस कर्मचारी कमी आहेत. दरमहा पोलिस सेवेतून सरासरी १० पोलिस कर्मचारी निवृत्त होत असतात, त्यामुळे रिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची भरती एका वर्षाने केली जात असल्याने ही उणीव भासून येत आहे. त्याचा परिणाम तपासकामावर होत आहे.
पोलिस खात्यात उत्तर व दक्षिण गोवा पोलिस स्थानके, क्राईम ब्रँच, सायबर कक्ष, आर्थिक गुन्हे विभाग, विदेशी प्रादेशिक नोंदणी विभाग, वाहतूक पोलिस, अमलीपदार्थ विरोधी कक्ष, विशेष शाखा, पिंक फोर्स, गोवा राखीव पोलिस असे विविध विभाग आहेत. यापैकी सर्वात अधिक फटका पोलिस स्थानक तसेच क्राईम बँचला बसत आहे.
रस्ता पोलिस स्थानकातील कर्मचा-ऱ्यांचा वापर तपास व चौकशी, भाडेकरू पडताळणी, अपघात, आरोपींना न्यायालयात रिमांडसाठी नेण्यासाठी, रात्रीच्या गस्तीसाठी, मोर्चा, अतिमहनीय व्यक्तींच्या गोव्यातील आगमनावेळी बंदोबस्त तसेच पोलिस स्थानका-तील दैनंदिन कामासाठी केला जातो.
प्रत्येक पोलिस स्थानकात पोलिसांची संख्या कमी असल्याची ओरड आहे. मात्र असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिस स्थानक प्रमुखांना हा गाडा रेटावा लागतो. वरिष्ठांना माहिती दिली जाते. काही वेळा गोवा राखीव पोलिस दल किंवा गोवा सशस्त्र दल पोलिसांची तात्पुरती मदत घेतली जाते. रिक्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या हजारावर पोहचली तरी नोकरभरती तातडीने केली जात नाही.
त्यामुळे पोलिस तपासकामावरही परिणाम होतो. सासष्टी तालुक्यातील पाच प्रमुख पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली असून, मंजूर ६४३ पदांच्या तुलनेत २०४ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम या तालुक्यातील मडगाव, मायणा-कुडतरी, कोलवा, कुंकळ्ळी व फातोर्डा पोलिस स्थानकांवर होत आहे.
कामाचा अतिरिक्त ताण
अपुऱ्या मनुष्यबळामुळे विद्यमान पोलिस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या क्षमतेवर होत आहे. वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे पोलिस कर्मचारी थकून जात असल्याने नागरिकांशी संवाद साधताना काहीवेळा त्यांचे वर्तन कठोर किंवा उद्धटपणाचे दिसून येते