Goa Panchayat Politics | चांदेल-हसापूरच्या सरपंचपदी निवड होताच तासाभरात अविश्वासाची खेळी; रिमा मळीक यांच्यासमोर आव्हान

चांदेल-हसापूर ग्रामपंचायतीतील राजकीय नाट्याला नवे वळण;
Chandel Hasapur Sarpanch No Confidence Motion
पेडणे : सरपंच पदी निवड झालेल्या रिमा मळीक यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करणारी पंचसदस्य.Pudhari
Published on: 
Updated on: 

Chandel Hasapur Sarpanch No Confidence Motion

पेडणे : चांदेल-हसापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. नाट्यमय घडामोडींनंतर रिमा मळीक यांची सरपंचपदी निवड झाली. मात्र, या निवडीला अवघा एक तास उलटत नाही तोच त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. त्यामुळे चांदेल-हसापूर ग्रामपंचायतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पेडणे तालुक्यात या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे.

सरपंचपदाच्या निवडीपूर्वीच नाराज पंचसदस्यांकडून अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. अखेर रिमा मळीक यांची निवड झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांच्याविरोधात अविश्वास अर्ज दाखल झाल्याने या चर्चांना पुष्टी मिळाल्याचे चित्र आहे. या अर्जावर पंचसदस्य बाळा शेटकर, रुचिरा मळीक आणि महेश नाईक यांनी सह्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Chandel Hasapur Sarpanch No Confidence Motion
Goa Crime : गोवा हादरले! ११ वर्षांच्या मुलाने ५ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

दरम्यान, पंचसदस्य तुळशीदास गावस हे यापूर्वीच सत्तारूढ गटापासून दूर राहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सत्तेची समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. या संपूर्ण घडामोडींमध्ये आमदार प्रवीण आर्लेकर यांची भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारताच रिमा मळीक यांच्यासमोर अविश्वास ठरावाचे आव्हान उभे ठाकले आहे. आता या अर्जावर पुढील प्रशासकीय प्रक्रिया काय होणार, ग्रामपंचायतीतील सत्तेचे गणित कोणाच्या बाजूने झुकणार आणि या राजकीय संघर्षात पुढील घडामोडी काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.