

Calangute Minor Assault Case
पणजी : कळंगुट येथे पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अल्पवयीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, १ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही घटना घडली. तक्रारदार व त्यांचे पती कामावर असताना शेजारी राहणाऱ्या ११ वर्षीय मुलाने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. तो मुलगा नेहमी तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी येत असे.
या प्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात भा.न्या.सं. कलम ६५(२), गोवा बालक कायदा २००३ चे कलम ८(२) आणि पोक्सो कायदा २०१२ ची कलमे ४, ८, १० अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि विधिसंघर्षग्रस्त बालक या दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सनिशा नाईक करीत आहेत. कळंगुट पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर, पर्वरी उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वेश कर्पे आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.