Goa NFHS 6 Report | राज्यातील बालकांचे वजन घटतेय

Goa NFHS 6 Report | एनएफएचएस अहवालातील निष्कर्ष; जन्मानंतर एका तासात स्तनपानात घट
infant
infant Pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील १५ वर्षांवरील महिला आणि पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याचे चित्र समोर आले असताना, दुसरीकडे बालकांच्या कुपोषणात घट झाल्याचे सकारात्मक संकेत राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) ५ आणि ६ अहवालातून दिसून आले आहेत. मात्र, पाच वर्षांखालील १९.९ टक्के बालकांचे वजन वयानुसार कमी असल्याने चिंतेचे सावट कायम आहे. अहवालानुसार, पाच वर्षांखालील १९.४ टक्के बालकांची उंची वयानुसार कमी आहे.

infant
Goa Women Survey | डिजिटल गोव्यात महिलांची बाजी! राज्यातील तब्बल 94 टक्के महिला करताहेत इंटरनेटचा वापर

यापूर्वी ही टक्केवारी २५.८ होती. १६.३ टक्के बालकांचे वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत कमी असून २.४ टक्के बालके अत्यंत कमी वजनाची आहेत. मागील सर्वेक्षणात हे प्रमाण अनुक्रमे १९.१ आणि ७.५ टक्के होते. यामुळे कुपोषणात घट झाली असली तरी ती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही, हे स्पष्ट होते. राज्यातील लहान बालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण केवळ ०.९ टक्के आहे. पूर्वी हे प्रमाण २.८ टक्के होते. सहा महिन्यांखालील १०० टक्के शिशूना स्तनपान दिले जात असल्याचे सकारात्मक चित्र कायम आहे.

मात्र, जन्मानंतर एका तासात स्तनपान सुरू करण्याचे प्रमाण ६१.६ टक्क्यांवरून घसरून ४७.९ टक्क्यांवर आले आहे. ६ ते २३ महिन्यांच्या बालकांना पुरेसा पूरक आहार मिळण्याचे प्रमाण २१.५ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. लसीकरणाच्या बाबतीत राज्याने लक्षणीय प्रगती साधली आहे. १२ ते २३ महिन्यांच्या बालकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण ८१.९ टक्क्यांवरून ९३.८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

infant
Maharashtra Helmet Usage: राज्यात केवळ 19 टक्के दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा योग्य वापर

बीसीजी आणि पोलिओ लसींचे कव्हरेज ९८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते बालकांच्या पोषण स्थितीत दिसणारी सुधारणा ही सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे फलित असली तरी ग्रामीण आणि दुर्गम भागांत अद्याप संतुलित आहार व पोषण शिक्षणाचा अभाव जाणवत आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनजागृती मोहिमांना गती देण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.

विशेषतः पहिल्या १००० दिवसांच्या पोषणावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास कुपोषणाचे प्रमाण आणखी कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, आरोग्य विभागाकडून मातृ व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत नियमित तपासण्या, पूरक पोषण आहार वितरण आणि लसीकरण मोहिमांना अधिक व्यापक स्वरूप दिले जात आहे. 'पोषण अभियान' आणि 'मिशन इंद्रधनुष' यांसारख्या योजनांमुळे लसीकरण आणि पोषण सुधारण्यात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

पाच वर्षांखालील बालकांची उंची व वजन

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बालकाचे जन्मावेळी वजन सुमारे २.५ ते ३.५ किलो आणि उंची ४८ ते ५२ सेमी असावी. १ वर्षांत वजन ८ ते १० किलो तर उंची ७२ ते ७६ सेमीपर्यंत वाढते. २ वर्षे वजन १० ते १२.५ किलो आणि उंची ८४ ते २० सेमी होते. ३ वर्षे वजन १२ ते १४.५ किलो आणि उंची २० ते २६ सेमी असते. ४ वर्षे वजन १४ ते १६.५ किलो आणि उंची ९६ ते १०२ सेमीपर्यंत वाढते, तर ५ वर्षे वयात वजन १६ ते १८.५ किलो आणि उंची १०२ ते ११० सेमी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news