

House damage in Adpai
आडपई: आडपई ग्रामपंचायत जवळ काल पहाटे सतत पडणाऱ्या पावसामुळे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. आज केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज शनिवारी संध्याकाळी पाच वाजता दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सरकार कडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी सरपंच व विद्यमान पंच क्षिप्रा आडपईकर यांनी सविस्तरपणे कालच्या दुर्घटनेबद्दल माहिती दिली.
यावेळी माजी पंच मशाल आडपईकर, दुर्घटनाग्रस्त अनुप मुळे, विठोबा नाईक, प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.