
नवरात्रोत्सवाला गोव्यात उत्साहात सुरुवात झाली असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. ठिकठिकाणी देवीच्या मंदिरांमध्ये आणि घराघरांत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होतात. मंदिरांमध्ये देवीदेवतांचे मखर आणि गाभारे आकर्षक फुलांनी, दिव्यांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजवले आहेत, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. हे मनमोहक मखर पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. बुधवारी (दि. २४) नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला गोव्यातील अनेक मंदिरांमधील देवीदेवतांना खास पोशाख आणि अलंकारांनी सजवण्यात आले होते. प्रत्येक मंदिराची सजावट वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण होती.
गोव्यातील कवळे येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा मंदिरात सजवलेले देवीचे मखर.
मडकई येथे नवरात्रीच्या तिसऱ्या रात्री मखरात व्याघ्रारुढ श्री देवी नवदुर्गा माता.
कुंडई येथील गरुडावर आरूढ श्री नवदुर्गा
श्री देव विठ्ठल पंचायतन संस्थान विठ्ठलापूर साखळी येथील श्री पांडुरंग रुक्मिणी आणि चंद्रभामा यांच्या सजवलेल्या मूर्ती.
मडकई येथील वाघावर आरूढ श्री नवदुर्गा देवी.
म्हार्दोळ येथे नवरात्रीच्या तिसऱ्या रात्री श्री महालसा देवीचे सजविलेले मखर.