Nanuz Fort Conservation Goa-नाणूस किल्ल्याच्या संवर्धनाचा प्रश्न लालफितीत

रस्त्याचे काम तातडीने सुरू करा : सत्तरी इतिहास संवर्धन समितीची मागणी
Nanuz Fort Conservation Goa
सत्तरी: येथील ऐतिहासिक नाणूस किल्ला.
Published on: 
Updated on: 

वाळपई : पुढारी वृत्तसेवा

सत्तरीतील ऐतिहासिक नाणूस किल्ल्याच्या संवर्धनाचा प्रश्न अद्याप लालफितीत अडकून पडला आहे. क्रांतिवीर दीपाजी राणे यांच्या शौर्याची आणि ऐतिहासिक योगदानाची दखल घेऊन सरकारने २६ जानेवारी रोजी नाणूस किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर देण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ गार्ड ऑफ ऑनर देऊन ऐतिहासिक वारशाचे जतन होणार नाही. त्यासाठी किल्ल्याचे प्रत्यक्ष संवर्धन आणि किल्ल्याकडे जाण्यासाठी आवश्यक रस्त्याची निर्मिती करणे गरजेचे आहे, अशी ठाम भूमिका सत्तरी इतिहास संवर्धन समितीने मांडली आहे.

Nanuz Fort Conservation Goa
Goa Crime : गोवा हादरले! ११ वर्षांच्या मुलाने ५ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

सत्तरी इतिहास संवर्धन समिती गेल्या १४ वर्षांपासून नाणूस किल्ल्याच्या संवर्धनासाठी सातत्याने जनजागृती आणि पाठपुरावा करत आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी क्रांती दिन साजरा करून या ऐतिहासिक किल्ल्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून केले जाते.

Nanuz Fort Conservation Goa
Sindhudurg Crime| ओसरगाव येथे १५ हजारांची गोवा दारू जप्त

या कालावधीत समितीने अनेक ऐतिहासिक कागदपत्रे आणि पुरावे संकलित केले आहे. मात्र, साधा रस्ताही तयार करण्यात आला नसल्याची माहिती इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अॅड. शिवाजी देसाई यांनी दिली.

... अन्यथा व्यापक आंदोलन

क्रांतिवीर दीपाजी राणे यांना गार्ड ऑफ ऑनर देण्याचा शासनाचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, त्यांच्या स्मृर्तीचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहता कामा नये. सरकारने केवळ आश्वासने न देता नाणूस किल्ल्याच्या संवर्धनासाठी तातडीने प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी इतिहास संवर्धन समितीने केली आहे. अन्यथा, गोवा आणि महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींना एकत्र करून व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धारही समितीने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.