Goa monsoon tourism-वर्षा पर्यटनाला हिरवा कंदील; जीएफडीसीचे धबधबे खुले

दूधसागरसह सहा धबधब्यांवर सुरक्षा व्यवस्था; पर्यटकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
Goa monsoon tourism
Goa monsoon tourism
Published on
Updated on

वाळपई : गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीएफडीसी) तर्फे व्यवस्थापित करण्यात येणारे सर्व धबधबे यंदाच्या पावसाळी पर्यटन हंगामासाठी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना आता दूधसागर, पाली (शिवलिंग), चरावणे, नानेली, सावरी आणि मैनापी या निसर्गरम्य धबधब्यांच्या सान्निध्यात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात या धबधब्यांकडे मोठ्या संख्येने देश विदेशातील पर्यटक आकर्षित होत असतात. यंदाही पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जीएफडीसीने सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पर्यटनासाठी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत.

पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी व्हावा यासाठी प्रत्येक धबधब्यावर प्रशिक्षित मार्गदर्शक, वन कर्मचारी आणि आवश्यक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावण्यात आले असून सुरक्षित पायवाटा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्र स्पष्टपणे चिन्हांकित करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. गर्दीच्या दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून परिस्थितीनुसार प्रवेशाचे नियमन केले जाणार आहे.

जीएफडीसीकडून धबधब्यांवरील पाण्याची पातळी, पाण्याचा वेग, हवामानातील बदल आणि परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. मुसळधार पाऊस, अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह किंवा प्रतिकूल हवामान निर्माण झाल्यास पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित धबधब्यांवरील प्रवेश काही काळासाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी वन विभाग, जीएफडीसी आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Goa monsoon tourism
Warren Alemao and ambulance -वॉरन आलेमाव आणि रुग्णवाहिका

सत्तरी तालुक्यातील चरावणे, नानेली, सावरी आणि पाली (शिवलिंग) धबधबे तसेच जागतिक कीर्तीचा दूधसागर धबधबा दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. मैनापी धबधबाही निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या सर्व पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेबरोबरच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार पर्यटनावर विशेष भर देण्यात आला आहे. जंगल परिसरात प्लास्टिक किंवा कचरा टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

सुरक्षिततेची जबाबादारी घ्या : डॉ. राणे

गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षा आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले की, प्रत्येक पर्यटकाची सुरक्षितता आणि कल्याण हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गोव्यातील जंगलांचे, जैवविविधतेचे आणि धबधब्यांचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आम्ही सर्वांचे स्वागत करतो. मात्र, पर्यटकांनी प्रशिक्षित देविया राणे मार्गदर्शक आणि वन कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. निसर्गाचा आनंद घेताना स्वतःची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संवर्धन यांची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Goa monsoon tourism
Cortalim opposition unity-कुठ्ठाळी मतदारसंघात विरोधकांची एकजूट ठरणार निर्णायक

पर्यटकांना सूचना

धबधब्यांमध्ये मद्यपान करून प्रवेश करू नये

धोकादायक कड्यांवर किंवा मोठ्या दगडांवर उभे राहून सेल्फी काढू नये

पाण्याच्या वेगवान प्रवाहात किंवा खोल भागात उतरू नये

प्लास्टिक, बाटल्या किंवा इतर कचरा जंगल परिसरात टाकू नये

वन्यजीव, झाडे आणि पर्यावरणाला हानी नको

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news