Sankalp Amonkar Goa | संकल्प आमोणकर यांच्याकडे कृषी, नागरी पुरवठा, हस्तकला; तीन महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार

तीन महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार; रोजगार निर्मितीचे आव्हान
Sankalp Amonkar Goa Portfolios
संकल्प आमोणकर
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने मंत्री संकल्प आमोणकर यांच्याकडे तीन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. नव्या खाते वाटपानुसार आमोणकर यांच्याकडे कृषी, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार, तसेच हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर या खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.

कृषी खात्याची जबाबदारी मिळाल्याने राज्यातील शेतकरी, कृषी उत्पादन, कृषी योजनांची अंमलबजावणी, तसेच शेतीशी संबंधित विविध प्रश्नांवर काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. त्याचबरोबर नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि ग्राहकांच्या

समन्वय राखण्याचे आव्हान

हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर उद्योगाला चालना देणे, स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढवणे याबाबतही आमोणकर यांच्यासमोर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. तीन महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार एकाच मंत्र्याकडे सोपविल्याने संबंधित खात्यांमधील योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासनातील समन्वय राखण्याचे आव्हानही आमोणकर यांच्यासमोर राहणार आहे.

Sankalp Amonkar Goa Portfolios
Pramod Sawant| गोवा राज्यात लवकरच पूर्ण क्षमतेने खाणकाम सुरू होणार

हिताशी संबंधित विषयही त्यांच्या अखत्यारित येणार आहेत. त्यांच्याकडे देण्यात आलेली ही मुख्य खाती यापूर्वी दिवंगत माजी मंत्री रवी नाईक यांच्याकडे होती.

Sankalp Amonkar Goa Portfolios
Goa Cabinet Expansion | अखेर संकल्प आमोणकर यांचा गोवा मंत्रिमंडळात बारावे मंत्री म्हणून समावेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.