Pramod Sawant| गोवा राज्यात लवकरच पूर्ण क्षमतेने खाणकाम सुरू होणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
Pramod Sawant
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : राज्यात लिलाव करण्यात आलेल्या १७ खनिज पट्ट्यांपैकी सध्या सहा पट्ट्यांमध्ये खाणकाम सुरू झाले आहे. उर्वरित पट्ट्यांपैकी आणखी ७ ते ८ खाणपट्ट्यांमध्ये डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

खाण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, दक्षिण गोव्यातील सुळकर्ण खाणपट्ट्यात लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यातील खाण व्यवसायाला आणखी गती मिळणार आहे. खाणकाम सुरू झाल्यामुळे ट्रक मालक, वाहतूकदार आणि खाण उद्योगाशी संबंधित विविध घटकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे नागरिकांनी तसेच पंचायतींनी खाणकामाला सहकार्य आणि पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

गुरुवारी राष्ट्रीय खाण परिषद होणार असून या परिषदेमुळे राज्यातील खाण उद्योगाच्या भविष्यातील दिशा, विकास आणि संभाव्य संधींवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लिलावात खाणपट्टे मिळूनही प्रत्यक्ष खाणकाम सुरू करण्यास विलंब करणाऱ्या बोलीदारांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खाण आणि भूविज्ञान संचालनालयाला अशा बोलीदारांची माहिती संकलित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक यशस्वी बोलीदाराच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. खाणकाम सुरू करण्यास झालेल्या विलंबाची कारणे तपासल्यानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास नियमांनुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, सरकार खाणकामातून निर्माण झालेल्या सहा खाण कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा लिलाव करण्याच्या तयारीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.