Mhadei Water Dispute: म्हादई पाणीप्रश्नी तीन राज्यांच्या जलसिंचन मंत्र्यांची मंगळवारी बैठक : सुभाष शिरोडकर

Mhadei Water Dispute: म्हादई पाणीप्रश्नी तीन राज्यांच्या जलसिंचन मंत्र्यांची मंगळवारी बैठक : सुभाष शिरोडकर

पणजी, पुढारी वृत्तसेवा : म्हादई प्रश्नी गोवा सरकार गंभीर आहे, म्हादई वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी म्हादई प्रवाहची बैठक दि. 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तसेच म्हादई सभागृह समितीची बैठक 29 फेब्रुवारीला बोलावण्यात आलेली आहे, अशी माहिती जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज दिली. Mhadei Water Dispute

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी शून्य प्रहरावेळी प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, सत्तरी व डिचोलीतील नद्यांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. म्हादई प्रश्नी सरकार वकिलावर करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र, वकील योग्य काम करताना दिसत नाही, असा आरोप म्हादई अभियानाने केलेला आहे. त्यामुळे सरकार नेमकी कुठली भूमिका घेणार असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला. Mhadei Water Dispute

यावर बोलताना सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, सत्तरी किवा डिचोलीतील नदीच्या पाण्याची पातळी कुठेही कमी झालेली नाही. म्हादई समस्या महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांशी संलग्न आहे, त्यामुळे थोडी अडचण होत असली तरी म्हादई प्रश्नी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या प्रवाहची महत्वाची बैठक 13 फेब्रुवारीरोजी बोलावण्यात आली आहे. त्यात गोव्याची बाजू आम्ही भक्कमपणे मांडू, असे सांगून म्हादईची संयुक्त पाहणी करण्यास आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
गोवा सरकारने स्थापन केलेल्या म्हादई सभागृह समितीची बैठक 29 फेब्रुवारीरोजी बोलावण्याचे शिरोडकर यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news