Mapusa Police Quarters | म्हापसा पोलिस क्वार्टर्स इतिहासजमा

Mapusa Police Quarters | जीर्ण इमारती पाडण्यास सुरुवात; १५ दिवस चालणार काम
Mapusa Police Quarters
Mapusa Police Quarters
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

उत्तर गोव्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या म्हापसा येथील पोलीस स्थानकाच्या आवारात पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासासाठी बांधण्यात आलेली जुनी पोलीस क्वार्टर्स इमारत अखेर इतिहासजमा होत आहे.

Mapusa Police Quarters
Margao Municipal Council Election | मडगाव पालिकेत पुन्हा राजकीय रणधुमाळी

म्हापसा पोलिस स्थानकाच्या परिसरातील जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या तिन्ही पोलीस निवासी गाळ्यांच्या इमारती जमीनदोस्त करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाने हाती घेतले असून, पुढील १५ दिवसांत या इमारती पाडल्या जाणार आहेत.

१९७६ मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास आणि विश्रांतीसाठी पोलिस खात्याने म्हापसा पोलिस स्थानकाच्या आवारात दुमजली बॅरेक आणि आठ निवासी गाळे असलेल्या दोन एकमजली क्वार्टर्स इमारती उभारल्या होत्या.

Mapusa Police Quarters
Goa Drugs Seizure Case | चार महिन्यांत 90 ड्रग्जविक्रेते गजाआड

पुढे निवासी गाळे अपुरे पडू लागल्याने १९८२ मध्ये आणखी सहा गाळ्यांची दुमजली इमारत बांधण्यात आली होती. गेल्या ४५ ते ५० वर्षांपासून या इमारती अनेक पोलिस कुटुंबांच्या आठवणींच्या साक्षीदार ठरल्या होत्या.

मात्र, अनेक वर्षे दुरुस्ती आणि डागडुजी न झाल्याने या निवासी इमारती अत्यंत जीर्ण आणि धोकादायक बनल्या होत्या. दरम्यान, या जागेवर आता आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा दोन नवीन बहुमजली निवासी इमारती उभारण्याची योजना असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news