Goa | सिद्दीकीला चौकशीसाठी पाच दिवस ईडी कोठडी

Goa Land Grab ED Case- सिद्दीकीला चौकशीसाठी पाच दिवस ईडी कोठडी
सिद्दीकी
सिद्दीकी
Published on
Updated on

पणजी : गोव्यातील कथित जमीन बळकाव आणि कागदपत्रांच्या सुलेमान शेख बनावट आधारे झालेल्या व्यवहारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात मेरशी न्यायालयाने संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान शेख याला चौकशीसाठी पाच दिवसांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) कोठडी दिली आहे.

सध्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात असलेल्या सिद्दीकला ईडीने न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी केली होती. जमीन बळकाव प्रकरणांत नोंदविण्यात आलेल्या चार वेगवेगळ्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत तपास सुरू केला आहे.

सिद्दीकी
Indian Book of World Records | एका गोमंतकीय लेखकाचा विश्वविक्रम

ईडीच्या मते, कथित गुन्ह्यातील आर्थिक व्यवहार, पैशांचा प्रवाह, बनावट कागदपत्रांचा वापर करून करण्यात आलेले जमीन व्यवहार तसेच इतर संबंधित व्यक्तींची भूमिका उघड करण्यासाठी संशयिताची सखोल चौकशी आवश्यक आहे. तपासादरम्यान संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासण्यात येणार असून, या गैरव्यवहारातून लाभघेतलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेतला जाणार आहे. याशिवाय, बनावट दस्तऐवज, फसवे सादरीकरण, आर्थिक व्यवहार आणि कथित इतर अनियमिततांबाबतही ईडी तपासाची व्याप्ती वाढविणार असल्याचे समजते.

सिद्दीकी
Goa | '39 अ' रद्द करा; 'इनफ इज इनफ' आक्रमक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news