Goa Road Accident | दुचाकीची कंटेनरला धडक; एक ठार एकजण गंभीर : कुर्टी - खांडेपार महामार्गावर केरयेत अपघात

दुचाकीची कंटेनरला धडक; एक ठार एकजण गंभीर : कुर्टी - खांडेपार महामार्गावर केरयेत अपघात, फोंडा : अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी.
Goa Road Accident
Goa Road Accident
Published on
Updated on

फोंडा : कुर्टी - खांडेपार महामार्गावर केरये येथे मोटारसायकल आणि कंटेनर ट्रक यांच्यातील भीषण धडकेत मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील दुसरा स्वार गंभीर जखमी झाला. मयताचे नाव उद्धव बाळासाहेब कोळी (वय २५) असे असून जखमी स्वाराचे नाव अभिषेक भीमराव धावरे (२५) असे आहे.

(जि. दोघेही पंढरपूर सोलापूर, महाराष्ट्र) येथील आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. राजस्थानहून गोव्यात फोंडा येथे माल घेऊन आलेला आरजे ०६ जीसी ९९८९ या क्रमांकाचा मालवाहू कंटेनर ट्रक अचानक नादुरुस्त झाल्याने केरये येथे महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आला. दुरुस्ती काम सुरू करण्यात आले. मात्र, रस्त्यावर थांबवण्यात आलेल्या ट्रकचालकाने कोणतीही खबरदारी घेतली नाही.

Goa Road Accident
Goa Casino Businessman Shooting| कॅसिनो व्यावसायिकावरील गोळीबार पूर्ववैमनस्यातून, संशयितांच्या जबाबांमधून क्राईम ब्रँचचा निष्कर्ष

दरम्यान, महाराष्ट्रातून फोंड्याला भरधाव येणारी एमएच १३ एफबी ५०१९ कमांकाच्या बुलेट मोटारसायकलने मागून कंटेनर ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य एकजण गंभीर जखमी झाला. त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Goa Road Accident
Goa Porvorim flyover AAP criticism | पर्वरी उड्डाणपूल सरकारचे मोठे अपयश, आपचा निशाणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news