Goa Heatwave Yellow Alert | राज्यात उष्णतेचा प्रचंड प्रकोप; हवामान खात्यातर्फे पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी

Goa Heatwave Yellow Alert | हवामान खात्याचा इशारा : शनिवारी तुरळक पावसाची शक्यता
Jalna yellow alert
Jalna yellow alertpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात उष्मा वाढला असून, हिवाळ्यात हुडहुडी ऐवजी अंग घामाने भिजण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. राज्यात सरासरी तापमान ३७.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी तुरळक पावसाचा अंदाज आहे.

Jalna yellow alert
Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

म्हापसामध्ये मंगळवारी ४१.४ तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते मंगळवारी दैनंदिन कमाल तापमानाचे ऑक्टोबर महिन्यातील सर्व ऐतिहासिक विक्रम मोडले आहेत. सोमवारी पणजीमध्ये सरासरीपेक्षा ४.८ ने जास्त, ३६.३ तापमानाची नोंद झाली.

ज्यामुळे तापमान १६ ऑक्टोबर २००८ रोजी नोंदवलेल्या राजधानीच्या ऑक्टोबर महिन्यातील ३७.२ या विक्रमी तापमानाजवळ पोहोचले आहे. आज बुधवारीही ३७ अंश तापमान नोंद झाले. पणजीमध्ये १ ऑक्टोबर रोजी ३२.८ तापमानाची नोंद झाली.

Jalna yellow alert
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

त्यानंतर ती सरासरी वाढत राहिली. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी तापमानात आणखी वाढ होऊन ते ३६.३ व १२ ऑक्टोबर रोजी ३६.३ व १३ रोजी ३६.३ व दि. १४ रोजी ३६ अंश सेल्सिअस नोंद झाली.

हवामानाच्या अंदाजानुसार, आठवड्याच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता आहे. १६ ऑक्टोबर रोजी उत्तर गोवा आणि कुशावती जिल्ह्यातील घाट परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात हलका पाऊस किंवा मेघगर्जेसह पावसाचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news