Minor Girl Assault | इन्स्टाग्रामवर मैत्री अन् 24 तासांत घात! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; बार्देशचा युवक गजाआड

Minor Girl Assault | बार्देशमधील युवकाला अटक; रवानगी न्यायालयीन कोठडीत
Minor Girl Assault Case |
Minor Girl Assault Case | कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंदPudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आदल्या दिवशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली आणि दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Minor Girl Assault Case |
Calangute Murder Case | कॅसिनोतील हार-जीत ठरली जीवावर! सुरतच्या पर्यटकाची गोव्यात निर्घृण हत्या; 3 मित्रांनी भर रस्त्यात भोसकले

पणजी महिला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तिसवाडी तालुक्यातील १७ वर्षीय मुलीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाने ८ मार्च रोजी तिच्याशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला.

दोघांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी ते दोघे भेटले. त्यावेळी युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे.

Minor Girl Assault Case |
Goa Cyber Police | म्हापशातील बंगल्यात 'इंटरनॅशनल' ठगबाजी! अमेरिकन नागरिकांना लुटणारे ७ सायबर गुन्हेगार गजाआड

तक्रारीच्या आधारे पणजी महिला पोलिस स्थानकाचे निरीक्षक मीरा डिसिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रूपाली गोवेकर यांनी त्या युवकाविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी त्या युवकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या युवकाला पणजी येथील पोक्सो न्यायालयाने प्रथम पोलिस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर संशयित युवकाला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. दरम्यान, संशयित युवकाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news