Goa Onion Price | गोव्यात महागाईतून दिलासा! 'फलोत्पादन' केंद्रांवर 58 रुपये किलो दराने मिळणार कांदा

Goa Onion Price | ग्राहकांना दिलासा ; बाजारभावापेक्षा कमी दरात विक्री
Onion
OnionPudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : खुल्या बाजारात कांद्याचे भाव ६५ ते ७५ रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्याने, सरकारच्या फलोत्पादन विकास महामंडळाच्या विक्री केंद्राद्वारे ५८ रुपये प्रति किलो अनुदानित दराने कांदा विकला जात आहे. ज्यामुळे हंगामी पुरवठ्याच्या तुटवड्यात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
कृषी संचालक आणि गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी भाववाढीला शेजारील राज्यांमधील पिकांच्या काढणीतील बदलाशी संबंधित एक नियमित वार्षिक घटना असे म्हटले आहे.

Onion
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्याचे सांगून राज्यात शहरी भागात कांद्याचा भाव ७५ रुपये प्रति किलो असताना, फलोत्पादनाच्या विक्री केंद्रांवर तो ५८ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. असे सांगून पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे पहिल्या हंगामातील काही पीक वारंवार खराब होते.

'पुरवठा साखळीत मालाची आवक सुरू झाली आहे. परंतु त्याचे प्रमाण मर्यादित असून पूर्ण क्षमतेने वितरण होण्यासाठी १५-२० दिवस लागतील, असे देसाई यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ग्राहकांना खुल्या बाजारातील जास्त किंमत देण्याची गरज नाही.

Onion
ST Political Reservation | "एसटी राजकीय आरक्षणासाठी 13 ऑगस्टला 'चलो पणजी'! 'उटा' संघटनेचा सरकारला थेट इशारा"

कारण महामंडळाच्या विक्री केंद्रावर अनुदानित दरात कांदा व इतर भाज्या उपलब्ध आहेत. आम्ही किरकोळ विक्रीच्या ट्रेंडवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहोत. बाजारावरील दबाव वाढल्यास पुढील हस्तक्षेप करण्यास तयार आहोत.

जर सरकारी दुकानांमधील किमती ७० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठण्याची किंवा ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली, तर महामंडळ मोठ्या प्रमाणात खरेदी करेल. महाराष्ट्रातील नाशिकसारख्या प्रमुख कांदा उत्पादक केंद्रांमधून माल येतो, असे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news