

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गांजासह इतर ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका विद्याथ्यनि पोलिसांनी दाखल केलेली तक्रार (एफआयआर) व आरोपपत्र रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली. ही एफआयआर म्हापसा पोलिसांनी एनडीपीएस कायद्याखाली नोंदवली होती.
उच्च न्यायालयाने नमूद केले की, याचिकाकत्यनि तपासकामासंदर्भात तसेच दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात मांडलेले मुद्दे वादग्रस्त तथ्यांशी संबंधित असून ते खटल्याच्या टप्प्यावरच तपासले जाऊ शकतात. हे मुद्दे मुळात याचिकाकर्त्याचे बचावात्मक दावे असल्याने, सध्याच्या याचिकेच्या कक्षेत त्यांचा विचार करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
म्हापसा पोलिसांनी गेल्यावर्षी ४ मे २०२५ रोजी म्हापसा येथील केटीसी बसस्थानकाजवळ परिसरात संबंधित विद्यार्थ्यांकडून १८० ग्रॅम वजनाचे हिरवट रंगाची पाने, फुले, फळे, बिया व वनस्पतीजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
या पदार्थास गांजाचा वास येत असल्याचे नमूद करण्यात आले असून, फील्ड ड्रग डिटेक्शन किट चाचणीत 'हायड्रोपोनिक बीड' (गांजा) असल्याचा सकारात्मक निष्कर्ष आला.
जप्त केलेल्या अंमली पदार्थाची अंदाजे बाजार किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी ५ मे २०२५ रोजी एफआयआर नोंदवून पुढील तपास केला व आरोपपत्र दाखल केले होते.