Candolim Illegal Construction Case | कांदोळीत डोंगरकापणीची खंडपीठाकडून दखल

Candolim Illegal Construction Case | सलमान खानशी संबंधित कंपनीसह सरकारी खात्यांना नोटिसा
Candolim Illegal Construction Case | कांदोळीत डोंगरकापणीची खंडपीठाकडून दखल
file photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कांदोळी येथील कथित बेकायदा डोंगर कापणी आणि बांधकाम प्रकरणाची गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना बांधकामांशी संबंधित असलेल्या सलमान खानसह राज्य सरकारी खात्यांना नोटिसा बजावून त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

Candolim Illegal Construction Case | कांदोळीत डोंगरकापणीची खंडपीठाकडून दखल
Pimpri Housing Society Waste Rules: पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायट्यांवर कचरा नियमांची सक्ती; एसटीपी-कंपोस्ट बंधनकारक

सलमान खान खंडपीठाने गंभीर याचिकेनुसार, कांदोळी परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगर कापणी करून विकासकामे होत असून, पर्यावरणीय तसेच नियोजनविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित प्रकल्पाचा संबंध अभिनेता सलमान खान भागीदार असलेल्या एका कंपनीशी असल्याचा दावाही याचिकेत केला आहे. याचिकेत किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियम, पर्यावरण संरक्षण कायदे तसेच शहर व नगर नियोजन (टीसीपी) नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

याचिकेनुसार, कांदोळी येथील सर्व्हे क्रमांक ८२/१-एफ मधील जागा सीआरझेड-३ क्षेत्रातील १०० मीटरच्या 'नो डेव्हलपमेंट झोन'मध्ये येत असतानाही तेथे निवासी व्हिला आणि अन्य बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अभिनेता सलमान खान मॅनेजिंग पार्टनर असलेल्या क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पर्यावरणीय आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून विकासकामे करण्यात आल्याचा दावा याचिकेत केला आहे.

Candolim Illegal Construction Case | कांदोळीत डोंगरकापणीची खंडपीठाकडून दखल
Goa CM Warning on My Home Scheme |पंचायत सचिव, तलाठ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी

पालन न करताच हा दाखला जारी केल्याचा आरोप

याचिकेनुसार, बांधकाम सिंकेरी नदीच्या भरतीरेषेपासून ५५ मीटर अंतरावर झाले असून ते सीआरझेड नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचा आरोप आहे. या ठिकाणी निवासी व्हिला आणि स्विमिंग पूल उभारण्यात आल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

कांदोळी ग्रामपंचायतीने ३० एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या भोगवटा प्रमाणपत्रालाही (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) याचिकेत आव्हान देण्यात आले. मंजुरीपेक्षा अधिक बांधकाम झाल्याचा व आवश्यक नियमांचे पालन न करताच हा दाखला जारी केल्याचा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news