Bombay High Court Goa |"शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा!; गोवा खंडपीठाचे मुरगाववासियांना महत्त्वपूर्ण निर्देश"

Bombay High Court Goa | पुढील सुनावणी २१ जुलैला ठेवली आहे.
Court News
Court NewsPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या मालकीच्या सडा येथील जागेवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी पर्यायी जागा सुचविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मुरगाववासियांना दिले. पुढील सुनावणी २१ जुलैला ठेवली आहे.

Court News
Goa High Court | "स्वतःच्या घरात शांततेने जगणे हा पालकांचा हक्क!"; छळ करणाऱ्या मुलगा-सुनेची याचिका हायकोर्टाने फेटाळली

सुनावणीवेळी याचिकेतील प्रतिवाद्यांमध्ये आमदार संकल्प आमोणकर तसेच काही मुरगावातील रहिवासी उपस्थित होते. मुरगाव बंदर प्राधिकरणे दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्या मालकीच्या जमिनीवर परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तो हटवण्यास स्थानिक आमदार संकल्प आमोणकर तसेच मुरगाववासियांनी विरोध केल्याने त्यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.

Court News
Supreme Court | छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम

खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा हटवण्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीतील निर्णयांचा आराखडा सादर केला. ही कारवाई करण्याची तारीख व वेळ अजूनही निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, २७ जुलैपूर्वी ही कारवाई केली जाईल असे खंडपीठाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news