Goa Water Metro Project | जल मेट्रो सेवा प्रकल्पास गती देण्यासाठी डीपीआरची तयारी

Goa Water Metro Project | मंत्री सुभाष फळदेसाई यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा
Water Metro Project
Water Metro ProjectPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलमार्गाच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यात जल मेट्रो सेवा सुरू - करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Water Metro Project
Porvorim Goa Traffic | गोव्यातील रस्ते बनले 'डेथ ट्रॅप'! वाहतूक पोलीस अन् प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेली वाहनांची वर्दळ

त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करण्याच्या सूचना केंद्राने सरकारला दिल्या आहेत. राज्यात ही जल मेट्रो सेवा सुरू झाल्यास पणजी ते हळदोणे, पणजी ते साखळी, पणजी ते सावर्डे, पणजी ते तेरेखोल या जलमार्गाचा समावेश होऊ शकतो.

या प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाई व खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांनी दिल्लीत केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन चर्चा केली.

Water Metro Project
ST Political Reservation | गोव्यातील एसटी आरक्षणासाठी भाजप दिल्लीत सक्रिय! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह बडे नेते हायकमांडच्या दारी

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात सोनोवाल यांच्याकडे चर्चा केली होती. केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्याशी झालेल्या या बैठकीत मंत्री फळदेसाई यांनी आर्थिक सहाय्य मिळण्यासंदर्भात चर्चा केली. या प्रकल्पाचा डीपीआर लवकरात लवकर करून पाठवा अशा सूचना त्यांनी फळदेसाई यांनी केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news