Bombay High Court | बांधकाम परवानग्यांबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय! सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करा

Bombay High Court | बांधकाम परवान्यांसाठी खंडपीठाचा सरकारला आदेश; याचिका निकालात
Uttarakhand High Court |
Uttarakhand High Court | दीर्घकालीन सहमतीचे संबंध बलात्कार नव्हे
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बांधकाम परवानग्या व संबंधित बाबींवर सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व संबंधित प्राधिकरणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे.

Uttarakhand High Court |
Sanvordem Panchayat Protest | मिराबाग बंधाऱ्याविरोधात सावर्डेवासीय आक्रमक

आम्नेलो बार्रेटो यांनी यांनी दाखल केलेली जनहित याचिका निकालात काढताना न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांसह राज्य सरकारकडून नंतर जारी करण्यात आलेल्या परिपत्रकांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

याचिकाकर्त्यांचे वकील साहिल सरदेसाई यांनी न्यायालयात मांडले की, पंचायत संचालनालय, नगरविकास विभाग आणि मुख्य नगररचना अधिकारी यांनी २०२५ व जानेवारी २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या १७ डिसेंबर २०२४ च्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी परिपत्रके काढली असली, तरी प्रत्यक्षात प्रभावी पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे या परिपत्रकांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली.

Uttarakhand High Court |
Goa Weather Update | गोव्याच्या वातावरणात मोठा बदल! बंगालच्या उपसागरातील पट्ट्यामुळे पावसाच्या सरींची शक्यता

राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अक्षता भट यांनी, अशा आदेशाला राज्य सरकारचा कोणताही आक्षेप नसल्याचे न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तसेच तीनही परिपत्रकांचा आढावा घेतल्यानंतर, खंडपीठाने मागितलेला दिलासा देणे योग्य असल्याचे नमूद केले.

ही याचिका निकाली काढताना, १७ डिसेंबर २०२४ चा निकाल तसेच ९ मे २०२५, आणि १४ जानेवारी २०२६ या तीनही परिपत्रकांची सर्व संबंधित प्राधिकरणांनी तत्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, असे न्यायालयाने स्पष्ट आदेशात म्हटले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी या आदेशाची प्रत सर्व संबंधित विभागांना पाठवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news