Goa Snakebite Case | गोव्यात सर्पदंशाची भयावह आकडेवारी! 4 वर्षांत 1,663 घटना आणि 30 जणांचा मृत्यू; पावसाळ्यात अधिक धोका

Goa Snakebite Case | ३० जणांचा मृत्यू, पावसाळी दिवसांत घटनांचे प्रमाण अधिक
The risk of snakebite increases during the monsoon season
Snakebite : पावसाळ्यात वाढतोय सर्पदंशाचा धोकाPudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील सर्पदंशाची आकडेवारी आणि सर्पदंशानंतर होणारी मानवी मृत्यूची संख्या निश्चितच भयावह आहे. पावसाळ्यात तर सर्पदंशाचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. दिवसाला साधारणपणे दोन सर्पदंशाच्या घटना घडतात. गोमेकॉ (जीएमसी) च्या अभ्यासातील आकडेवारीनुसार २०२० ते २०२४ या कालावधीत गोव्यात सर्पदंशाच्या १,६६३ घटना आणि ३० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

The risk of snakebite increases during the monsoon season
Maharashtra Maternal Mortality:महाराष्ट्रात 971 मातामृत्यू; घट असूनही हा आकडा तज्ज्ञांना चिंताजनक का वाटतो?

यावरून, सर्पदंशाच्या घटनांमुळे निर्माण होणारे सार्वजनिक आरोग्याचे आव्हान कायम असल्याचे दिसून येते. झाली आहे. यावरून, सर्पदंशाच्या घटनांमुळे निर्माण होणारे सार्वजनिक आरोग्याचे आव्हान कायम असल्याचे न्यायवैद्यकशास्त्र विभागातील डॉ. चेतन कारेकर आणि डॉ. पूर्वी मिशाळ यांनी 'द अकॅडमिक' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते.

संशोधकांनी नोंदवले की २१ ते ३० वयोगटातील तरुण हा सर्वाधिक प्रभावित गट होता, तर एकूण प्रकरणांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक होते. संशोधनानुसार, सर्पदंशाच्या बहुतेक घटना ग्रामीण आणि वनक्षेत्रात घडल्या.

The risk of snakebite increases during the monsoon season
NHA Report 2026 | राज्याचा आरोग्य खर्च राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट

तथापि, शहरी प्रकरणांमध्येही वाढ दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, ही वाढ वेगाने होणारे बांधकाम आणि जंगलतोड यामुळे होणाऱ्या अधिवासाच्या विनाशाला कारणीभूत आहे. अभ्यासानुसार, गोव्यात दरवर्षी ५०० ते ६०० सर्पदंशाच्या घटनांची नोंद होते आणि पावसाळ्यात दररोज सरासरी जवळपास दोन घटना घडतात. ही आकडेवारी एका व्यापक राष्ट्रीय चिंतेचे प्रतिबिंब आहे, कारण जगातील सर्पदंशाच्या एकूण घटनांमध्ये भारताचा मोठा वाटा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news