Vijay Sardesai: गोव्यात राजकीय भूकंप! 'दिल्ली गेली तेल लावत', म्हणत विजय सरदेसाईंनी आपसोबतची 'गोवा फर्स्ट' आघाडी संपवली

Vijay Sardesai | गोवा फॉरवर्डचा 'आप' सोबतची युती संपवण्याचा निर्णय ; फलक, होर्डिंग्ज हटवले
Goa Assembly Elections
Vijay Sardesai Pudhari photo
Published on: 
Updated on: 

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांची एकजुट करण्यासाठी आम आदमी पक्ष (आप) आणि गोवा फॉरवर्डने स्थापन केलेल्या 'गोवा फर्स्ट' आघाडीला ब्रेक लागला आहे. जनतेच्या भावनेचा आदर करून 'आप'सोबतची युती संपवत असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी जाहीर केले. त्यानंतर आघाडीचे फलक व होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात झाली आहे.

Goa Assembly Elections
Sal River Pollution | सासष्टीची जीवनदायिनी धोक्यात! मडगाव-फातोर्डाच्या सांडपाण्याने साळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात

गोंयकार घर येथे आयोजित जनता दरबारात ते बोलत होते. काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने 'आप'सोबत आघाडी करण्यात आली होती. मात्र, आघाडीबाबत जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याने पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सरदेसाई म्हणाले.
गोवा फॉरवर्ड हा गोमंतकीयांनी स्थापन केलेला प्रादेशिक पक्ष असल्याने जनतेच्या भावना व अपेक्षांचा विचार करणे ही पक्षाची जबाबदारी आहे. गोव्यातील राजकारण गोव्याच्या परिस्थितीनुसार झाले पाहिजे. दिल्ली व पंजाबमधील राजकारण गोव्यात आणण्याची गरज नाही, असे सांगत त्यांनी 'आप'वर अप्रत्यक्ष टीका केली.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी परस्परांविरोधात लढण्याऐवजी एकत्र येणे आवश्यक आहे. 'गोवा फर्स्ट' केवळ 'आप' आणि गोवा फॉरवर्डपुरती मर्यादित न राहता भाजपविरोधी सर्व पक्षांचे व्यापक व्यासपीठ असावे, अशी जनतेची भावना असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

त्यानुसार सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड पुढाकार घेणार आहे. युतीचे फलक हटवण्याचा निर्णय कोणत्याही दबावामुळे नसून जनतेच्या भावनेचा आदर करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने काही दिवस हा विषय बाजूला ठेवण्यात येईल. त्यानंतर पुढील राजकीय दिशा निश्चित केली जाईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.

Goa Assembly Elections
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

राज्याच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य:
काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे का, यावर बोलताना विजय सरदेसाई यांनी सध्या त्याबाबत ठोस माहिती दिली नाही. वेळच सांगेल की ही आघाडी कोणते स्वरूप घेते, असे ते म्हणाले. आपला पक्ष गोमंतकीय जनतेसोबत असून, राज्याच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

दिल्ली गेली तेल लावत, गोवा महत्त्वाचा!:
गोव्यातील राजकीय निर्णय हे दिल्ली किंवा पंजाबसारख्या इतर राज्यांतील घडामोडींवर आधारित नसून गोमंतकीय जनतेच्या इच्छेनुसार घेतले जावेत. दिल्ली गेली तेल लावत, आम्हाला गोवा महत्त्वाचा आहे. गोव्यातील राजकीय दिशा ठरवताना बाहेरील राज्यातील घडामोडींना महत्त्व देण्यापेक्षा गोमंतकीय जनतेला काय हवे आहे, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news