Goa fishing ban|राज्यात आजपासून मासेमारी बंद

मत्स्यखवय्यांना खाडी, गोड्या पाण्यातील माशांची प्रतीक्षा
fishing banned
पणजी : मासे खरेदी करताना ग्राहक.pudhari photo
Published on
Updated on

पणजी : राज्यातील मासेमारी बंदीचा बिगुल वाजला. राज्यात आजपासून मासेमारी बंद होणार असून ३१ जुलैपर्यंत बंदी असणार आहे. त्यामुळे समुद्रातील मासे रोजच्या जेवणात वापरणाऱ्या मत्स्यखवय्यांना आता खाडीतील आणि गोड्या पाण्यातील माशांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

fishing banned
Goafest 2026 | दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या जाहिरात महोत्सवाचा गोव्यात शानदार प्रारंभ; 'गोवाफेस्ट 2026' ला देश-विदेशातून गर्दी

यावर्षी मान्सून लांबणीवर पडला आहे. मे महिन्यात पडणारा वळीव पाऊस आणि मान्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने अजूनही मासेमारीसाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र, मत्स्यप्रजातींच्या प्रजननाचा काळ असल्याने मासेमारी बंदी आवश्यकच आहे.

शेजारील महाराष्ट्र राज्यात तर यावर्षी मत्स्य प्रजातींचा प्रजनन काळ लक्षात घेऊन मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. या निर्णयामुळे मत्स्य उत्पादनात वाढ होण्याची आशा महाराष्ट्र सरकारला आहे. गोव्यानेही तसा विचार करावा, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.

fishing banned
Porvorim Flyover Project | राज्याची स्वयंपूर्ण गोव्याकडे घोडदौड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news