Mankurad Mango | गोव्याचा पहिला मानकुराद आंबा बाजारात दाखल! एका आंब्याची किंमत तब्बल 600 रुपये

Mankurad Mango | गोव्याच्या प्रसिद्ध मानकुराद आंब्याची विक्री सुरू; पहिल्याच आंब्याला मिळाला विक्रमी भाव
Goa Mankurad Mango
Goa Mankurad Mango
Published on: 
Updated on: 

शिवोली : पुढारी वृत्तसेवा

गोव्याच्या भूमीतील सर्वांच्या पसंतीचा मानकुराद आंबा यंदाच्या हंगामात विक्रीसाठी दाखल झाला आहे. एका मानकुराद आंब्यासाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. यंदाच्या हंगामातील गोव्याचा पहिला मानकुराद आंबा विक्रीसाठी बाजारात आणण्याचा मान ओशेल-शिवोली येथील आंबा उत्पादक समीर तातो धारगळकर यांना पुन्हा एकदा प्राप्त झाला आहे.

Goa Mankurad Mango
Siolim Primary Health Center | शिवोली आरोग्य केंद्राची दुरवस्था; 7 कोटींची नवी इमारत पण एक्स-रे मशीन गायब!

समीर धारगळकर यांनी यंदाही हंगामातील पहिला मानकुराद आंबा बाजारात आणण्याची परंपरा कायम राखली आहे. गोव्याच्या मानकुराद आंब्याला बाजारपेठेत विशेष मागणी आहे. हंगामातील या पहिल्या आंब्याला नेहमीच वेगळे महत्त्व प्राप्त होते. यंदा एका मानकुराद आंब्याचा दर ६०० रुपये असून, एका डझनसाठी तब्बल ७ हजार २०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या आंब्यांची विक्री पणजी बाजारपेठेत करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.